नरेंद्र मोदी पुन्हा पश्चिम बंगाल दौऱ्यावर, ममता बॅनर्जी ही उपस्थित राहणार, यावेळी काय घडणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारीला केंद्रीय जलमंत्रालयाच्या पश्चिम बंगालमधील कार्यक्रमासाठी जाणार आहेत, (Narendra Modi Mamata Banerjee)

नरेंद्र मोदी पुन्हा पश्चिम बंगाल दौऱ्यावर, ममता बॅनर्जी ही उपस्थित राहणार, यावेळी काय घडणार?
ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. राजकीय नेत्यांकडून आपल्या सोईसाठी पक्षबदल, आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी अशा अनेक गोष्टी पश्चिम बंगलाच्या राजकारणात सुरु आहेत. हे सगळं काही घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महिनाभरात दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) देखील अपस्थित राहणार आहेत पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्रीय जलमंत्रालयाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. ममता बॅनर्जींनी 23 जानेवारीच्या कार्यक्रमात घोषणा देणाऱ्यांना सुनावलं होतं. यावेळी नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एकत्र आल्यावर काय घडणार हे पाहावं लागणार आहे. (PM Narendra Modi and CM Mamata Banerjee came together in West Bengal on 18 February)

18 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी बंगालमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारीला केंद्रीय जलमंत्रालयाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग विभागचं भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमात जलमंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत देखील उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी इतर विकासकामांचे देखील उद्घाटन करणार आहेत.

नरेंद्र मोदी ममता बॅनर्जी पराक्रम दिवसावेळी एकाच मंचावर

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापले होते. एखाद्याला कार्यक्रमाला बोलवायचं आणि त्याची बेईज्जती करायची हे तुम्हाला शोभत नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सुनावलं होतं. ममता बॅनर्जी यांचा हा संतप्त अवतार पाहून सर्वचजण अवाक् झाले होते.

कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोक आले होते. मात्र, कार्यक्रमात वारंवार ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’चे नारे सुरू होते.

संबंधित बातम्या :

जेव्हा मोदी समक्ष ममता दीदीने ‘जय श्रीराम’चे नारे देणाऱ्यांना सुनावलं!

बंगाल ‘पराक्रम’मध्ये आज मोदी, आसाममध्ये शाहाही दौऱ्यावर

(PM Narendra Modi and CM Mamata Banerjee came together in West Bengal on 18 February)

Published On - 12:42 pm, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI