AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : 4 हजार 78 दिवस, पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींना टाकलं मागे… पंडित नेहरू किती पुढे ?

सर्वात जास्त काळ देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे नेते बनणार आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात 4 हजार 78 दिवस पूर्ण केले आहेत. यामुळे त्यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही मागे टाकले आहे.

Narendra Modi : 4 हजार 78 दिवस, पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींना टाकलं मागे... पंडित नेहरू किती पुढे ?
| Updated on: Jul 25, 2025 | 9:20 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्यांच्या नावावर आणखी एक नवा विक्रम करणार आहेत. सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे मोदी हे दुसरे नेते बनणार आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात 4 हजार 78 दिवस पूर्ण केले आहेत. हा कालावधी पूर्ण करतानाच त्यांनी देशाच्य माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही मागे टाकलं आहे.

शुक्रवारी नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना मागे टाकून सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनतील. अधिकाऱ्यांच्यां सांगण्यानुसार, आज अर्थात शुक्रवारी पंतप्रधान मोदी हे त्यांच्या ऑफीसमध्ये 4 हजार 078 दिवस पूर्ण करतील. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून 4 हजार 077 दिवस पूर्ण केले होते. 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 सालापर्यंत त्या सलग 4,077 दिवस पंतप्रधान होत्या.

तर देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तीन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला विजय मिळवून दिला. सलग तीन वेळा त्यांच्या पक्षाला विजय मिळवून देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंनी 6 हजार 130 दिवस देशाची सेवा केली. ते 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 सालापर्यंत पंतप्रधान पदी कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ 16 वर्ष 9 महिने आणि 12 दिवस इतका होता. पण नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरींची बरोबरी केली आहे. त्यांनी देखील आपल्या पक्षाला (भाजप) लाोपाठ तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे.

नरेंद्र मोदी यांनी केली पंडित नेहरूंची बरोबरी

गुजरातमध्ये जन्मलेले नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा मध्ये पंतप्रधान झाले आणि अजूनही पंतप्रधानपद भूषवत आहेत. 2001 साली ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात जास्त काळ बिगर-काँग्रेसी पंतप्रधान बनले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोन पूर्ण टर्म पूर्ण करणारे पहिले आणि एकमेव बिगर-काँग्रेसी नेते आहेत.

सर्वात जास्त काळ पदावर राहिलेले बिगर काँग्रेसी पंतप्रधान

नरेंद्र मोदी हे भारतातील एकमेव नेते आहेत ज्यांनी एकाच पक्षाचे प्रतिनिधी म्हणून सलग सहा मोठ्या निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत 2002, 2007 आणि 2012 साली तर देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 2014, 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी विजय मिळवला.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.