AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi: केंद्राकडून राज्यांना मोफत लस पुरवठा, पीएम गरीब कल्याण योजनेस मुदतवाढ, नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi: केंद्राकडून राज्यांना मोफत लस पुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.

PM Narendra Modi: केंद्राकडून राज्यांना मोफत लस पुरवठा, पीएम गरीब कल्याण योजनेस मुदतवाढ, नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 5:46 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशातील जनतेशी संवाद साधला . कोरोना महामारीमध्ये केंद्र सरकारनं केलेल्या कामांची नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. कोरोना संदर्भातील त्यांच्या सरकारच्या कामाबद्दल बोलताना नरेंद्र मोदींनी जुन्या सरकारांच्या काळातील लसीकरणावर देखील भाष्य केले. देशातील राज्यांना केंद्र सरकार मोफत लस पुरवठा करणारअसल्याचं नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. यासोबत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेस दिवाळीपर्यंत मुदवाढ दिल्याची घोषणा देखील त्यांनी केली.  (PM Narendra Modi declare Government of India will provide free vaccine to states important points of pm speech)

गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी महामारी

कोरोनाची दुसरी लाट आलीय, तिच्याविरुद्ध भारताचा लढा सुरु आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे आपणही दु:खातून जात आहे. आपण अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावलं. त्या सर्व कुटुंबाप्रती माझी संवेदना. गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठी महामारीचं संकट, यापूर्वी अशी महामारी कोणी पाहिली, ना पाहतील, असं मोदी म्हणाले.

रेल्वे, वायूसेना, नौसेना यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी काम केलं

भारतात मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, सर्व यंत्रणा कोरोनाविरोधी लढ्यात सहभागी झाल्या. जगाच्या कानाकोपऱ्यातून ऑक्सिजन मिळवण्यात आला.कोरोनाशी लढताना गेल्या सव्वा वर्षात नव्या आरोग्य सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढली. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी रेल्वे, वायूसेना, नौसेना यांनी काम केलं. जगातील जिथून जे उपलब्ध होईल ते भारतात आणलं गेलं. कोरोनाची आवश्यक औषध आणली गेली. देशातील त्याचं उत्पन्न वाढवलं गेलं.

भारतात लस निर्मिती नसती तर आपली स्थिती काय झाली असती?

कोरोना लढ्यातील सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे कोरोनाचे नियम पाळणे. मास्क, सुरक्षित अंतर पाळणे हे आवश्यक आहे. व्हॅक्सिन हे सुरक्षा कवच आहे. लसनिर्मिती करणारे देश आणि कंपन्या जगात बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. भारतात आज भारतातील लस नसती, तर आपल्या विशाल देशाची अवस्था काय झाली असती?

लसीकरणाचं कव्हरेज वाढवलं

2014 मध्ये भारतात लसीकरण कव्हरेज 60 टक्क्यांच्या आसपास होतं. ही भारतासाठी चिंताजनक बाब होती. अशावेळी भारताला 100 टक्के लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 40 वर्षे लागली असती. त्या पार्श्वभूमीवर आपण मिशन इंद्रधनुष योजना आणली. मिशन मोडवर काम करुन आपण केवळ 4-5 वर्षात लसीकरण कव्हरेज आपण 60 टक्क्यांवर 90 टक्क्यांवर आणलं.

भारतीय बनावटीच्या दोन लसींची निर्मिती

जगाला चिंता होती की भारत कोरोनाचा सामना कसा करेल? पण नियत साफ आणि मेहनत असेल तर सगळं होतं. भारताने 1 वर्षात एक नाही तर दोन भारतीय बनावटीच्या लसींची निर्मिती केली. आपण दाखवून दिलं की भारत अनेक मोठ्या देशांपेक्षा मागे नाही. आणखी तीन कोरोना लसींची चाचणी सुरु आहे. देशात 7 कंपन्यां लस उत्पादन करत आहेत.

केंद्र सरकारला वेगवेगळ्या सूचना

देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर वेगवेगळ्या सूचना आल्या. सगळं भारत सरकार ठरवत आहे. राज्य सरकारांना सूट का दिली जात नाही, असा प्रश्न विचारला गेला. वयोमर्यादा केंद्र सरकार का करत आहे, असा प्रश्न विचारला गेला. ज्येष्ट नागरिकांचं अगोदर लसीकरण का? केंद्र सरकारवर दबाव आणला गेला. देशातील माध्यमातील एका वर्गानं मोहीम चालवली.

लसीकरणाचं विकेंद्रीकरण करा, राज्य सरकारांची मागणी

लसीकरणाचं विकेंद्रीकरण करा अशी मागणी काही राज्य सरकारांनी केली. वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. त्यानंतर त्यांच्या मागणी नुसार 1 मेला लसीकरणाचं धोरण जाहीर करण्यात आलं. 16 जानेवारीपासून एप्रिलच्या शेवटपर्यंत सर्वांना मोफत लस देण्याचं काम सुरु होतं. लोक येऊन लोक लस घेत होते. राज्य सरकारांनी मागणी केल्याप्रमाणं लस खरेदीची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.

21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार

आता जी जबाबदारी राज्यांना दिली होती, ती 25 टक्के जबाबादारी केंद्र स्वीकारेल, येत्या दोन आठवड्यात ते लागू केलं जाईल. त्याबाबत नवी नियमावली तयार केली जाईल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार.

लसनिर्मिती कंनप्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 75 टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन, राज्य सरकारांना मोफत देणार. आतापर्यंत देशातील अनेक नागरिकांना मोफत लस मिळाली आहे. आता १८ वर्षावरील लोकांनाही मोफत लस मिळेल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा कालावधी वाढवला

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअतंर्गत गरिबांना धान्याचं वाटप दिवाळीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

कोरोना लसीविषयीच्या अफवांपासून दूर राहा

कोरोना लसी भारतात बनवल्या जात असताना लसींबद्दल अफवा पसरवण्यात आल्या. कोरोना लसी संदर्भातील विविध अफवा पसरवण्यात आल्या. देशातील नागरिकांनी कोरोना लसींच्या अफवांपासून दूर राहावं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या:

मोदींची मोठी घोषणा! 18 वर्षावरील सर्वांचं 21 जूनपासून मोफत लसीकरण करणार, केंद्र सरकार सर्व खर्च उचलणार

PM Narendra Modi speech highlights : सर्वांना मोफत लस, दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य!

(PM Narendra Modi declare Government of India will provide free vaccine to states important points of pm speech)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.