AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सूत्रे हातात, एलपीजीच्या संकटात मंत्र्यांना अत्यंत मोठ्या सूचना, आता..

इराण आणि अमेरिका यांचे युद्ध टोकाला पोहोचले आहे. मात्र, या युद्धाचा परिणाम जगावर होत आहे. भारतात देखील एलपीजी गॅसचे मोठे संकट आहे. त्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. मोदींनी आपल्या मंत्र्यांना काही महत्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सूत्रे हातात, एलपीजीच्या संकटात मंत्र्यांना अत्यंत मोठ्या सूचना, आता..
PM Narendra Modi Meeting
| Updated on: May 22, 2026 | 7:37 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात संकट उभे आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने इंधन पुरवठा विस्कळीत झाला. पूर्ण साखळीच विस्कळीत झाली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीवर तणाव आहे. किती नाही म्हटले तरीही कुठे ना कुठे एक तणाव बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट तणाव भारतात बघायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीमध्येही वाढ झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढताना दिसत आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. ज्याने अनेक व्यवसायांवरही परिणाम झाला. महागाई थेटपणे वाढली. लोकांना वेळेवर एलपीजी गॅस मिळत नाहीये. यामुळे दिवसेंदिवस समस्या या वाढतच आहेत. जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हे युद्ध सुरू आहे. आता या सर्व संकटांवर तोडगा काढण्याकरिता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. त्यांनी या संकटातून मार्ग काढण्याकरिता पुढाकार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावर होते. भारतात दाखल होताच त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. ही बैठक दिल्लीत तब्बल 4 तासांपेक्षाही जास्त वेळ सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात आपल्या मंत्र्यांना सांगितले की, एलपीजीचे नवीन पुरवठादार शोधा. होर्मुज खाडीत तणाव आहे, तोपर्यंत भारतात इतर मार्गाने एलपीजी गॅस कसा आणता येईल, यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मोदी सरकार ऊर्जा सुरक्षेबाबत अधिकाधिक सतर्क असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना पर्यायी ऊर्जा स्रोतांवरील कामाला गती देण्याचे आवाहन केले. एलपीजीला पर्याय म्हणून बायोगॅसच्या प्रचारावर भर दिला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, येणारा काळ हा अधिक आव्हानात्मक असू शकतो. भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी जलद पावले उचलावी लागतील.

पश्चिम आशियातील संकट आणि तेल पुरवठ्यावरील संभाव्य धोका लक्षात घेता, सरकार आता दीर्घकालीन धोरणाचा अवलंब करू इच्छिते. सरकारकडून सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, परिस्थिती जागतिक पातळीवर भयंकर आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले नाही तर स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ