VIDEO: पंतप्रधान मोदी युजफूल आहेत का युजलेस; राहुल गांधी म्हणाले…

VIDEO: पंतप्रधान मोदी युजफूल आहेत का युजलेस; राहुल गांधी म्हणाले...

ला तुमच्या बोलण्यात एक सुधारणा करायची आहे. प्रत्येक गोष्टीचा एक फायदा असतोच. | Rahul Gandhi

Rohit Dhamnaskar

|

Feb 27, 2021 | 2:44 PM

चेन्नई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशातील नागरिकांसाठी निरुपयोगी (Useless) असले तरी देशातील दोन व्यक्तींसाठी ते खूपच कामाचे (Useful) आहेत. मात्र, याच दोन व्यक्ती आपलं काम झालं की त्यांना कचऱ्यासारखं फेकून देतील, असे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले. (Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi)

ते शनिवारी तामिळनाडू येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निरुपयोगी (Useless) आहेत का, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटले की, मला तुमच्या बोलण्यात एक सुधारणा करायची आहे. प्रत्येक गोष्टीचा एक फायदा असतोच. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी निरुपयोगी आहेत की उपयोगी आहेत, हा प्रश्नच नाही. ते कोणासाठी उपयोगी आहेत, हा खरा चर्चेचा मुद्दा आहे, असे राहुल यांनी म्हटले.

मी देशातील शेतकरी, महिला आणि गरीब लोकांसाठी उपयोगी पडणारा आहे. पण नरेंद्र मोदी हे केवळ दोनच व्यक्तींच्या उपयोगी पडणारे आहेत. मोदींमुळे या दोन व्यक्तींचा प्रचंड फायदा होत आहे. कारण, या दोन व्यक्ती पंतप्रधानांच्या माध्यमातून त्यांची संपत्ती वाढवत आहे. ही गरज संपल्यावर त्या दोन व्यक्ती नरेंद्र मोदी यांना कचऱ्यासारखं फेकून देतील, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया देण्यात येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का? भर कार्यक्रमात मुलीचा प्रश्न, राहुल गांधी म्हणाले…

राहुल गांधी हे सध्या दक्षिणेतील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच पुद्दुचेरी येथे त्यांचा कार्यक्रम झाला होता. राहुल गांधी हे पुदुचेरीत एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांनी नेहमीचा पांढरा सदरा-कुर्ता हा पोशाख बाजूला सारून जीन्स आणि टी-शर्ट घातला होता. यावेळी एका लहान मुलीने राहुल गांधींच्या वर्मावर बोट ठेवले. तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का, असा प्रश्न तिने विचारला. या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला, सर्वांच्या नजरा राहुल गांधी काय बोलणार याकडे लागल्या होत्या. मात्र, या प्रश्नाचे उत्तर मी नंतर कधीतरी देईन, असे सांगत राहुल गांधी यांनी वेळ मारून नेली.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना ‘हम दो हमारे दो’ म्हणायचं असेल तर आधी लग्न करावं लागेल : रामदास आठवले

(Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें