J&K All Party Meet : जम्मू-काश्मीर प्रश्नावरील बैठक सुरू, मोदींसह 14 नेते सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत आज (24 जून) सुरू झालीय. मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 8 राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलंय.

J&K All Party Meet : जम्मू-काश्मीर प्रश्नावरील बैठक सुरू, मोदींसह 14 नेते सहभागी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत आज (24 जून) सुरू झालीय. मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 8 राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलंय. त्यामुळे या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान मोदींशिवाय गृह मंत्री अमित शाह, जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, प्रधान सचिव पीके मिश्रा, गृह सचिव अजय भल्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत (PM Narendra Modi meet Jammu Kashmir all party leaders in Delhi).

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुपकार गटाच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

दरम्यान या बैठकीत जम्मू काश्मीरमधील विकास कामांविषयी चर्चा होईल असं सांगितलं जातंय. यात इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र शासित प्रदेशात रस्ते, वीज आणि पाण्यासारख्या मुलभूत बाबींवर काय काम झालंय याचीही माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Jammu-Kashmir: सोपोरमध्ये पोलीस-CRPFच्या पथकावर ‘तोयबा’चा हल्ला, 2 पोलीस शहीद; 3 नागरिक ठार

जम्मू काश्मीरमध्ये बस स्टँडवर ग्रेनेड स्फोट, 7 लोक जखमी, सैन्याकडून शोधमोहिम सुरू

पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते राकेश पंडिता यांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

PM Narendra Modi meet Jammu Kashmir all party leaders in Delhi

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI