Manipur : धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये नवीन पहाट, पंतप्रधान मोदींचा आज इंफाळ दौरा, काय केल्या मोठ्या घोषणा
PM Narendra Modi visit Manipur Today : 2023 मध्ये भडकलेल्या हिंसेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर जात आहेत.ते चुराचांदपूर आणि राजधानी इंफाळ येथील विकास कामांचे उद्धघाटन करतील.

गेल्या दोन वर्षांपासून मणिपूर जळत होते. मणिपूरमध्ये 2023 मध्ये जातीय हिंसाचार उफाळला. त्यावर तोडगा काढण्याचे हरएक प्रयत्न सपशेल फसले. पण नंतर आता दोन्ही समुदायात शांतीपर्व आणण्यात यश आले. मणिपूरकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केल्याचा सारखा आरोप विरोधक करत होते. आतापर्यंत या हिंसाचारात 260 हून अधिक लोक मारल्या गेले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांनी अनेकांना धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मणिपूर दौऱ्यावर आहेत. ते आज विरोधकांवर काय टीका करतात आणि मणिपूरला काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मणिपूरमध्ये शांतता नांदेल का? असाही सवाल करण्यात येत आहे.
विकास योजनांचा धडाका
- 1. पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा मिझोरममधील आयजोल येथून सुरू होईल. येथे ते 9,000 कोटींच्या विकास योजनांचे उद्धघाटन करतील.
- 2. या योजनांमध्ये बैराबी-सैइरांग रेल्वे मार्ग, 45 लांबीच्या आयजोल बायपास रोड,थेंजावल-सियालसूक आणि खंकॉर्न-रॉंगुरा रस्ता, मुअलखांगमध्ये एलपीजी बॉटलिंग प्लँटचे उद्धघाटन करतील.
- 3. लाँगटलई-सियाहा मार्गावरील छिमतुईपुई नदीवरील पूल आणि खेलो इंडिया मल्टिपर्पज इंडोर हॉलचे उद्धघाटन करतील. आयजोल आता दिल्ली, गुवाहाटी आणि कोलकत्ताने रेल्वेशी जोडल्या जाईल.
- 4. मोदी हे चुराचांदपूर येथे जातील. येथे कुकी समुदायाचे मुख्य केंद्र आहे. 2023 मध्ये भडकलेल्या हिंसाचारात हा भाग सुद्धा होता. या हिंसाचारात 260 हून अधिक लोक मारल्या गेले. तर अनेक जण विस्थापित झाले होते. 1988 नंतर चुराचांदपूर येथे जाणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.
- 5. दुपारी 2:30 वाजता पीएम मोदी हे राजधानी इंफाल येथे जातील. तिथे ते 1200 कोटींच्या योजनांचे उद्धघाटन करतील. कांगडा किल्ल्यात ते एक सार्वजनिक सभेत संवाद साधतील.
- 6. मणिपूरसाठी इंफाल येथे नवीन पोलीस मुख्यालयाचे उद्धघाटन होईल. एका सचिवालयाचे उद्धघाटन करतील. या सर्व योजनेसाठी जवळपास 5000 कोटींच्या घरात खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक नागरी सुविधांचा पण समावेश आहे.
- 7. मणिपूर धगधगत असताना पंतप्रधाना नरेंद्र मोदी तिथे कधीच गेले नाही असा विरोधकांचा आरोप होता. 2023 मध्ये काँग्रेसने संसदेत या मुद्दावरून अविश्वास प्रस्ताव सुद्धा आणला होता. भाजपने सुद्धा काँग्रेसच्या काळात मणिपूरच्या हिंसेचे दाखले दिले होते.
