AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi On Vande Mataram : मुस्लिम लीग, नेहरु… वंदे मातरम् राष्ट्रगानाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर मोठे आरोप

PM Modi On Vande Mataram : "150 वर्ष तो महान अध्याय आणि त्या गौरवाचं पुनर्स्थापना करण्याची संधी आहे. देशाने आणि सभागृहाने ही संधी सोडली नाही पाहिजे. हे तेच वंदे मातरम् आहे, ज्याने 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Modi On Vande Mataram : मुस्लिम लीग, नेहरु... वंदे मातरम् राष्ट्रगानाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर मोठे आरोप
PM Narendra Modi
| Updated on: Dec 08, 2025 | 1:27 PM
Share

वंदे मातरम् या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज लोकसभेमध्ये चर्चा होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या चर्चेला सुरुवात झालीय. “वंदे मातरम् या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत, ही गर्वाची बाब आहे. मी सर्वांचे आभार मानतो. या महत्वपूर्ण प्रसंगी सामूहिक चर्चेचा मार्ग निवडला. ज्या मंत्राने, जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाल ऊर्जा, प्रेरणा दिली, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला, त्या वंदे मातरम् च स्मरण करणं हे आपल्या सर्वांच सौभाग्य आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “वंदे मातरम् चा 150 वर्षांचा प्रवास अनेक टप्प्यांवरुन गेला आहे. वंदे मातरम् ला 50 वर्ष झाली, तेव्हा देश गुलामीमध्ये होता. ज्यावेळी वंदे मातरम् ला 100 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आणीबाणी लागलेली. वंदे मातरम् साठी अत्यंत उत्तम पर्व पाहिजे, तेव्हा संविधानाचा गळा घोटलेला” असं पीएम मोदी म्हणाले.

“ज्यावेळी वंदे मातरम् ला 100 वर्ष झाली, त्यावेळी देशभक्तीसाठी जगणारे-मरणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकलं होतं. ज्या वंदे मातरम् गीताने देशाच्या स्वातंत्र्याला ऊर्जा दिली. त्याला 100 वर्ष पूर्ण होताना आमच्या इतिहासाचा एक काळा कालखंड दुर्भाग्याने समोर येतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस झुकली

“काँग्रेसने मुस्लिम लीग समोर गुडघे टेकले. इतिहास याचा साक्षीदार आहे. काँग्रेसचे नेते आजही वंदे मातरम् वर वाद निर्माण करतात. मागच्या पिढीत वंदे मातरम् वर इतका अन्याय का झाला? वंदे मातरम् चा विश्वासघात झाला. वंदे मातरम् ला मुस्लिम लीगचा विरोध होता. तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस झुकली” असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जिन्नाच्या विरोधानंतर नेहरुंना आपल्या खुर्चीला धोका वाटला

“देशावर जेव्हा संकट आलं तेव्हा वंदे मातरम् चा जयघोष झाला. वंदे मातरम् वर मुस्लिम लीगचं राजकारण अधिक तीव्र होत गेलं. वंदे मातरम् ला मुस्लिम लीगचा विरोधच होता. आपल्यावर वंदे मातरम् कर्ज आहे. जिन्नाने 1937 साली वंदे मातरम् ला विरोध केला. नेहरुंनी मुस्लिम लीगची निंदा केली नाही. जिन्नाच्या विरोधानंतर नेहरुंना आपल्या खुर्चीला धोका वाटला. जिन्नाच्या विरोधानंतर नेहरुंना भिती वाटली. वंदे मातरम् च्या काही शब्दांवर मुस्लिमांना आक्षेप होता. काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या दबावाखाली निर्णय घेतला” असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम् च्या चर्चे दरम्यान केले.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर