AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi Speech : फुटीरतावादी मानसिकता काँग्रेसच्या DNAमध्येच; मोदींची संसदेत जहरी टीका

काँग्रेसच्या डीएनएमध्येच फुटीरतावादी मानसिकता आहे. तमिळ समाजाची भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. इंग्रज निघून गेले पण फोडा आणि राज्य कराची मानसिकता काँग्रेसनं टिकवून ठेवली. काँग्रेस ही टुकडे-टुकडे गँगची लीडर आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत केलाय.

PM Narendra Modi Speech : फुटीरतावादी मानसिकता काँग्रेसच्या DNAमध्येच; मोदींची संसदेत जहरी टीका
नरेंद्र मोदी, राहुल गांधी
| Updated on: Feb 07, 2022 | 8:26 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसच्या डीएनएमध्येच फुटीरतावादी मानसिकता आहे. तमिळ समाजाची भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. इंग्रज निघून गेले पण फोडा आणि राज्य कराची मानसिकता (Separatist mentality) काँग्रेसनं टिकवून ठेवली. काँग्रेस ही टुकडे-टुकडे गँगची लीडर आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली. ‘देशानं आदरणीय लता दीदीला गमावलं आहे. एवढा मोठा काळ ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित केलं, देशाला प्रेरित केलं, देशाला भावनांनी भरलं. मी आज आदरणीय लतादीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो’, असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटाच्या (Corona Outbreak) काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘मी हैराण आहे की काँग्रेसला अचानक कर्तव्याची बाब टोचतेय. तुम्ही म्हणता की मोदी नेहरुंचं नाव घेत नाहीत. तर मी आज तुमची इच्छा पूर्ण करतो. कर्तव्याबाबत पंडित नेहरु म्हणाले होते की, मी पुन्हा तुम्हाला सांगतो की स्वतंत्र भारत आहे. स्वतंत्र भारताचा वाढदिवस आपण साजरा करतो पण स्वातंत्र्यासोबत जबाबदारी असते. जबाबदारी केवळ सत्तेची नाही तर एका स्वतंत्र व्यक्तीची असते. जर तुम्ही ती जबाबदारी समजू शकत नाही तर तुम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ पूर्णपणे समजलेला नाही’.

‘2014 मध्ये गरीबांनीच काँग्रेसला हटवलं’

राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबतही पंतप्रधान मोदींनी पलटवार केला. काँग्रेस संविधानाचा अपमान करत आहे. राष्ट्र कोणतीही सत्ता किंवा सरकारी व्यवस्था नाही. आमच्यासाठी राष्ट्र ही एक जिवंत आत्मा आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, काँग्रेसनं गरीबी संपवण्याबाबत मोठ्या घोषणा केल्या. गरीब जागरुक आहेत म्हणूनच तुम्हाला 44 जागांवर समाधान मानावं लागलं. देशातील गरीब सत्य जाणतात. गरीबी हटवण्याचा नाऱ्यावर काँग्रेस निवडणूक जिंकत राहिली. काँग्रेस 1971 पासून गरीबी हटवत आहे. पण 2014 मध्ये गरीबांनी काँग्रेसला हटवलं, असा जोरदार टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.

पंतप्रधानांची महाराष्ट्र सरकार, काँग्रेसवर घणाघाती टीका

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचं पालन करत होतं. who सल्ला देत होतं. तज्ज्ञ म्हणत होते की जो तिथे आहे तिथेच थांबा. कारण माणूस एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तेव्हा काँग्रेसनं काय केलं, तर मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजुरांना तिकीटं देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोज आहे तो जरा कमी व्हावा. तुम्ही जा… तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात. तुम्ही बिहारचे आहात. जा… तिथे कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठं पाप केलं. अफरातफरीचं वातावरण निर्माण केलं. कामगार बांधवांना अनेक कठीण प्रसंगात ढकलून दिलं’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केलीय.

इतर बातम्या :

काँग्रेसचा पराभव का झाला? धन्यवाद प्रस्तावात नरेंद्र मोदींनीच सांगून टाकलं कारण! वाचा काय म्हणाले

PM Modi Speech in Parliament: इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे, मोदींचा शेरो शायरीतून काँग्रेसवर घणाघाती हल्ला

Modi | ‘आपका प्यार अजरामर रहे’ असं मोदींनी म्हटलं आणि एकच हशा पिकला! नेमकं घडलं काय?

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.