AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलम 370 रद्द करणे हीच डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली; PM नरेंद्र मोदी असे का म्हणाले?

narendra modi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

कलम 370 रद्द करणे हीच डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली; PM नरेंद्र मोदी असे का म्हणाले?
| Updated on: Jul 06, 2026 | 1:17 PM
Share

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची विविध ठिकाणी आज सोमवारी 125 वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक नेते त्यांना अभिवादन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना अभिवादन केलं. पीएम मोदींनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांचं जीवन, विचार, राष्ट्र निर्माणासाठी दिलेल्या योगदानासाठी मोदींनी पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, डॉ. मुखर्जी यांनी भारताची एकता, प्रतिष्ठा, प्रगतीसाठी आयुष्य समर्पित केलं. भारताची अखंडता ठेवणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं ध्येय होतं. 2019 मध्ये कलम 370 आणि 35अ हटवणे हीच त्यांच्या कार्यासाठी दिलेली योग्य श्रद्धांजली आहे. त्यांचं कार्य आणि बलिदान राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे’.

पंतप्रधान मोदींकडून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींच्या आठवणींना उजाळा

‘जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्याला त्यांचा विरोध होता. 2019 साली कलम 370 आणि 35A मध्ये हटवणे हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी श्रद्धांजली होती. डॉ. मुखर्जी हे शहाणपण, लोकसेवेचे संगम होते, असे त्यांनी सांगितले. ‘शिक्षणतज्ज्ञ आशुतोष मुखर्जी यांनी सुखसोयीचा त्याग करून जनसेवेचा मार्ग निवडला. मुलगा आणि पत्नीच्या निधनानंतरही त्यांनी राष्ट्रसेवेचा निर्धार केला होता. पुढे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगाल भारताचा अविभाज्य भाग राहील, यावर भर दिला होता. तसेच जम्मू आणि काश्मीरबाबतही तोच विचार होता, असे मोदींनी पुढे सांगितले.

‘डॉ. मुखर्जी हे कोलकाता विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू होते. त्यांनी वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन दिलं. तसेच त्यांनी कृषी शिक्षण, शिक्षण प्रशिक्षण यास प्रोत्साहन दिलं, असे मोदींनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी डॉ.मुखर्जी यांच्या विचाराचा संदर्भ देत म्हणाले की, ‘शैक्षणिक संस्थांना भविष्यातील क्लर्क आणि कमी पगारावर काम करणारे कर्मचारी तयार करण्याचे कारखाने समजणे चुकीचे आहे. नेतृत्व करण्यास सक्षम असणारे विद्यार्थी घडवले पाहिजे’.  तसेच मोदींनी मंत्रि‍पदाचा कार्यकाळ, आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न, जवाहरलाल नेहरू यांच्याशी असलेले वैचारिक मतभेद यावरही भाष्य केलं.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे