खराब हवामानाचा फटका, पंतप्रधानांचा सिक्कीम दौरा रद्द, पण तीन राज्यात जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या चार राज्यांचा दौरा करणार आहेत. त्यातील एका राज्याचा दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे त्यांचा सिक्कीमचा दौरा रद्द झाला असून सिक्कीमच्या जनतेशी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. तर, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मोदी जाणार असून या ठिकाणी असंख्य प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा सिक्कीम दौरा रद्द केला आहे. खराब हवामानामुळे मोदींना सिक्कीमला जाता आलं नाही. सिस्कीम राज्याचा आजचा आज 50 वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने गंगटोकमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यांना आता बागडोगराहूनच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सिक्कीमच्या लोकांशी संवाद साधावा लागणार आहे. सिक्कीमचा दौरा रद्द झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन राज्यांचा दौरा मात्र होणार आहे.
ठरलेल्या कार्यक्रमानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारपासून चार राज्यांच्या दौऱ्यावर होते. पीएम मोदी आज आणि उद्या (29 आणि 30 मे) सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात सिक्कीमपासून होणार होती. पण खराब हवामानामुळे ते सिक्कीमला जाऊ शकले नाही. पीएम मोदी राजधानी गंगटोकमधील पलजोर स्टेडियममध्ये सिक्कीमच्या स्थापनेची 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ते पश्चिम बंगालला रवाना होणार होते.
पंतप्रधान म्हणून मोदींचा सिक्कीमचा हा दुसरा दौरा होता. पण खराब हवामानामुळे ते येऊ शकले नाही. त्यापूर्वी सरकारने एक स्टेटमेंट जारी केलं होतं. पीएम मोदी सिक्कीमच्या विकासाशी संबंधित असंख्य प्रकल्पांचा शिलान्यास करतील. उद्घाटनेही करतील. यात नामची जिल्ह्यातील 750 कोटी खर्चाच्या 500 बेडच्या जिल्हा रुग्णालयाचा समावेश होता. तसेच ग्यालशिंग जिल्ह्यातील पेलिंगच्या सांगाचोलिंग प्रवासी रोपवे आणि गंगटोकमध्ये अटल अमृत उद्यानमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रमही होणार होता.
सिक्कीममध्ये मोदींचा दौरा
राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याने या निमित्ताने स्मारक नाणं आणि टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी पावणे दहा वाजता लिबिंग हेलिपॅडवर उतरतील. त्यांचा ताफा 10 वाजता पलजोर स्टेडियमला पोहोचेल. त्यानंतर साडे अकरा वाजता सिक्कीमला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतील, असं गंगटोकचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक तेनजिंग लोडेन लेप्चा यांनी सांगितलं होतं. मात्र, आता खराब हवामानामुळे या दौऱ्यात बदल झाला आहे.
दरम्यान, मोदींच्या दौऱ्या निमित्ताने राणीपूलपासून गंगटोक पर्यंतचे सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, आता मोदी सिक्कीमवरून पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वारला रवाना होतील.

pm modi
बंगालमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद
मोदी पश्चिम बंगालमध्ये एक गॅस वितरण योजनेचा शिलान्यास करतील. त्यानंतर अलीपूरद्वार येथील एका जनसभेला संबोधित करतील. सर्वात आधी मोदी सरकारी कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर अलीपूरद्वारमध्ये पार्टीच्या बैठकीला संबोधित करतील. त्यानंतर संध्याकाळी मोदी बिहारची राजधानी पटना येथे जातील. ऑपरेशन सिंदूरनंतरचा मोदी यांचा हा पश्चिम बंगालचा पहिला दौरा आहे, असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी सांगितलं.
CGD प्रकल्पाचा शिलान्यास
पीआयबीच्या निवेदनानुसार, मोदी सरकारी समारंभा दरम्यान अलीपूरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यातील सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (सीजीडी) योजनेचा शिलान्यास करतील. सीजीडी प्रकल्पासाठी 1,010 कोटीची तरतूर करण्ता आली आहे. 2.5 लाखाहून अधिक घरात आणि 100 हून अधिक व्यावसायिक प्रतिष्ठान आणि उद्योगात पीएनजीचा पुरवठा करण्याचं उद्दिष्ट्ये आहे. सरकारने 19 सीएनजी स्टेशनच्या माध्यमातून वाहनांमधून सीएजनीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
बिहारमध्ये रोड शो
त्यानंतर मोदी बिहारला जातील. आज संध्याकाळी 5.45 वाजता पटना येथे मोदी पोहोचतील. पटना एअरपोर्टच्या नवीन प्रवासी टर्मिनलचं मोदी उद्घाटन करतील. 1200 कोटीची तरतूद करून हे नवीन टर्मिनल तयार करण्यता आलं आहे. नवीन टर्मिनल प्रत्येक वर्षी 1 कोटी प्रवाशांचा भार वाहू शकणार आहे.
त्याशिवाय 1410 कोटी रुपये खर्चाच्या बिहटा एअरपोर्टच्या नव्या सिव्हिल एन्क्लेव्हचा शिलान्यासही मोदी करतील. बिहटा, पटनाच्या जवळ एक शैक्षणिक केंद्र आहे. या ठिकाणी आयआयटी पटना आणि प्रस्तावित एनआयटी पटना कँपस आहे. पीएम मोदी आज संध्याकाळी 5 बजे पटना येथे रोड शो करतील. बिहारमध्येत त्यांचा रात्रीचा मुक्काम असणार आहे.
उद्या उत्तर प्रदेशात
मोदी उद्या शुक्रवारी बिहारच्या काराकाट शहरात सकाळी 11 वाजता 48.520 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक प्रकल्पाचं लोकार्पण होणार असून काही प्रकल्पांचा शिलान्यासही होणार आहे. त्याशिवाय ते एका सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत.
त्यानंतर मोदी उत्तर प्रदेशला रवाना होतील. दुपारी 2.45 वाजता कानपूर नगरमध्ये 20,900 कोटी खर्चाच्या असंख्य प्रकल्पांचा शिलान्यास आणि उद्घाटन मोदी करतील. यावेळी ते एका जनसभेलाही संबोधित करणार आहेत.
