सकारात्मक! मुल दत्तक घेणाऱ्या पालकांची मुलींना पसंती; गेल्या तीन वर्षांत दत्तक मुलींची संख्या वाढली

मुल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढत आहे. केंद्रीय महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने नुकतीच एक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली, या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.

सकारात्मक! मुल दत्तक घेणाऱ्या पालकांची मुलींना पसंती; गेल्या तीन वर्षांत दत्तक मुलींची संख्या वाढली
Image Credit source: INDIAN EXPRESS
अजय देशपांडे

|

May 31, 2022 | 8:46 AM

मुंबई : मुलगा, मुलगी समान असे घोषवाक्य आपण अनेकदा ऐकतो. मात्र आजूनही मुलगा (Son) आणि मुलीमध्ये (Daughter) भेदभाव केला जातो. आपल्या अवतीभोवती अशा अनेक घटना आपल्याला पहायाला मिळतात. ज्यामधून मुलगा आणि मुलीमधील भेदभाव उघड होतो. मात्र अशाही परिस्थितीमध्ये एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुल दत्तक (Adopted) घेऊ इच्छाणाऱ्या पालकांची पसंती मुलांपेक्षा मुलींना अधिक असल्याचे समोर आले आहे. याबाबत केंद्रीय महिला बाल कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या ‘सेंट्रल अडोप्शन रिसोर्स ऑथोरिटीकडून आकडेवारी सादर करण्यात आली आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षभरता जी बालके दत्त घेण्यात आली, त्यामध्ये मुलीचे प्रमाण तीस टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात एकूण 2950 बालके दत्तक घेण्यात आली, त्यामध्ये मुलींचे प्रमाण तीस टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. त्याच्या मागच्या वर्षी देखील दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलींचेच प्रमाण अधिक होते.

कोणत्या वर्षी किती मुली दत्तक?

गेल्या काही वर्षांमध्ये पालक बालक दत्तक घेताना मुलींना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. 2019-20 मध्ये जी बालके दत्तक घेण्यात आली होती, त्यामध्ये 1938 एवढ्या मुली होत्या तर 1413 मुले होती. 2020-21 मध्ये दत्तक घेण्यात आलेल्या बालकांमध्ये मुलींची संख्या 1856 एवढी होती. तर मुलांची संख्या 1286 एवढी होती. 2021-22 मध्ये दत्तक मुलींची संख्या 1674 होती तर मुलींची संख्या 1276 इतकी होती. वरील आकडेवारीवर नजर टाकल्यास सलग तीन वर्ष मुलींची संख्या वाढल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया ही केंद्रीय पातळीवरून सुरू असून, याच माध्यमातून नोंदणी करत मुल दत्तक घेता येते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

मात्र याबाबत तज्ज्ञांनी वेगळे मत मांडले आहे. मुली दत्तक घेण्याचे प्रमाण का वाढले? याबाब बोलताना तज्ज्ञांनी सांगितले की, ज्या दाम्पत्याला मुल होत नाही ते मुल दत्तक घेतात. मात्र मुल दत्तक घेताना तो मुलगाच असावा याबाबत ते आग्रही नसतात. जे बालक दत्तक मिळेल त्याचा ते स्विकार करतात. आपल्याकडे सध्या मुली दत्तक देण्याचे प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे अनाथ आश्रमात देखील मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुलीचे दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें