AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केदारनाथ गेले होते कपल,ट्रेनमधून रात्री पत्नी गायब झाली, नेमके काय झाले ?

तीन महिन्यांपूर्वी लग्न होऊन एक दाम्पत्य केदारनाथला गेले होते. येथून परतताना ट्रेनमधून अचानक मनिष याची पत्नी ट्रेनमधून गायब झाली. अखेर त्या रात्री काय झाले ?

केदारनाथ गेले होते कपल,ट्रेनमधून रात्री पत्नी गायब झाली, नेमके काय झाले ?
Pragya Singh Reveal Truth
| Updated on: May 11, 2026 | 8:53 PM
Share

प्रज्ञा सिंह हिच्या लग्नला केवळ तीन महिने झाले होते. ती तिच्या पती सोबत केदारनाथ यात्रेला गेली होती. परतताना डेहराडून – गाझियाबाद नंदा देवी एक्सप्रेस ट्रेन घरी परतत होती. अचानक रहस्यमय परिस्थिती ती गायब झाली होती. आपली पत्नी अचानक गायब झाल्याने तिचा पती घाबरला. त्याने संपूर्ण ट्रेनमध्ये त्याच्या पत्नीला शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना पाचारण केले. अखेर प्रज्ञा कुठे गायब झाली ? याची कहाणी मोठी रंजक आहे.

माहितीनुसार ५ मेच्या रात्री प्रज्ञा सिंह तिचा पती मनिष याच्या सोबत केदारनाथचा पूर्ण करुन देहराडूनहून गाझियाबादला परतत होती. पती-पत्नी दोघेही नंदा देवी एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. मनीष यांनी सांगितले की हरिद्वार गेल्यानंतर त्यांच्यात बोलणी झाली आणि त्यानंतर पती मनीषला झोप आली. मनीष याच्या म्हणण्यानुसार मुझफ्फरनगर स्टेशनच्याजवळ ट्रेन पोहचली तेव्हा त्याला जाग आली. त्याने पाहिले तर पत्नी जागेवर नव्हती. सुरुवातालीला त्याला वाटले की ती वॉशरुमला गेली असेल. मात्र, बराच वेळ झाला तरी प्रज्ञा काही आली नसल्याने त्याने संपूर्ण ट्रेनमध्ये शोधाशोध करायला सुरुवात केली.

फोन बंद आणि ट्रेनमध्ये सापडली नाही

मनिष याने दोन्ही वॉशरुम आणि आसपासच्या डब्यात शोधाशोध केली. परंतू प्रज्ञा हीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. तिचा मोबाईल फोन देखील बंद होता. ट्रेन स्टेशनला थांबल्यानंतरही मनिषने प्रज्ञाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेर त्याने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. अखेर प्रकरण रुडकी कोतवाली येथे ट्रान्सफर केली. तेथे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

तपास दरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फारसा उपयोग झाला नाही. मनीष याने आरोप केला की रुडकी आणि मुझफ्फरनगर स्टेशनवरील कॅमेरे काम करत नव्हते. त्यामुळे हे कळणे अवघड झाले की प्रज्ञा ट्रेनमधून उतरली की नाही हे कळणे कठीण झाले.

पतीला संशय आला

पतीला आपल्या पत्नीचे काही बरेवाईट झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने पोलिसांना मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे ट्रॅक आणि आजूबाजूचा कित्येक किलोमीटरचे सर्च ऑपरेशन चालवले. परंतू कोणताही सुगावा लागला नाही. पोलिसांनी प्रज्ञा हीचे कॉल डिटेल रेकॉर्ड, मॅसेज आणि व्हॉट्सएप चॅट तपासले, मात्र, काहीही संशयास्पद सापडले नाही.

पतीशी झाले भांडण…

अखेर पोलिसांनी बराच तपास केल्यानंतर सहा दिवसांनी प्रज्ञा सिंह बिहारच्या बेगुसराय येथे सापडली. पोलिसांनी तिच्या कुटुंबाला प्रज्ञा सुखरुप सापडल्याची वर्दी दिली. या प्रकरणात लक्सर एसपी देहात शेखर चंद्र सुयाल यांनी सांगितले की या महिलेले सुखरुपणे ताब्यात घेतले आहे. प्रज्ञाने सांगितले की त्या रात्री ट्रेनमध्ये तिचे पतीशी भांडण झाले होते. पती झोपायला गेल्यानंतर तिने गुपचुप ट्रेनमधून उतरुन विनातिकीट ती दुसऱ्या ट्रेनमध्ये चढली. ती विनातिकीट बिहारच्या बेगुसराय येथे पोहचली. तिला ती ज्या ट्रेनमध्ये चढली आहे ती बिहारला जात आहे हेही माहिती नव्हते. तेथे पोहचल्यानंतर तिने तिच्या आईला फोन करुन आपण सुखरुप असल्याचे सांगितले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?