AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi | बेस्ट आणि बिगेस्ट, हाच मोदींचा मंत्र! तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा हाच राजमार्ग

What India Thinks Today | मोठ्या बहुमताने तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याचा हुंकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 च्या मंचावरुन भरला. आज TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. काँग्रेसच्या धोरणावर प्रहार करत, बेस्ट आणि बिगेस्ट हाच मोदी मंत्र असल्याचे अधोरेखित केले.

PM Narendra Modi | बेस्ट आणि बिगेस्ट, हाच मोदींचा मंत्र! तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा हाच राजमार्ग
| Updated on: Feb 27, 2024 | 9:18 AM
Share

नवी दिल्ली | 27 February 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा 2024 साठी रणशिंग फुंकले. विजयाची हॅटट्रिक करण्याचा मंत्रच त्यांनी सांगितला. बेस्ट आणि बिगेस्ट हाच मोदी मंत्र असल्याचे सांगत बहुमताने तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा हुंकार त्यांनी भरला. देशातील क्रमांक एकचे न्यूज नेटवर्क TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. आता लालफितशाही आणि वेळकाढूपणाच्या धोरणाला भारताने कधीच मागे टाकले आहे. काँग्रेसच्या चालढकल करण्याच्या धोरणावर त्यांनी हल्लाबोल केला. त्यांनी गेल्या दहा वर्षांतील कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला. आम्ही जे पण करतो ते बेस्ट आणि बिगेस्ट करतो हा मंत्र त्यांनी दिला. तर TV-9 च्या मंचावरुन मिशन 2024 साठी राजकीय अजेंडा पण सेट केला.

मन के हारे हार है, मन के जीते जीत है

भारताच्या प्रगतीचे कारण मीमांसा करताना, ज्याचा मनात उमेद आहे. तो विजय होतो, ज्याच्या मनात जोश आहे, तो काहीतरी घडवून दाखवतो, असा मंत्र पंतप्रधानांनी दिला. बिग लीप तर आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण जोशात असू. ऊर्जाने भरलेलो असेल. कोणी हताश, निराश देश असो की व्यक्ती, बिग लीपच्या बाबत विचार करू शकत नाही. ही थीमच सर्व सांगण्यासाठी पुरेशी आहे की, आजच्या भारताचा आत्मविश्वास किती उंचावर आहे. आकांक्षा काय आहेत. आज जगाला वाटतंय भारत एक मोठी झेप घ्यायला तयार आहे. तर त्याच्या पाठी दहा वर्षाचा पॉवर फुल लॉन्च पॅड आहे. दहा वर्षात असं काय बदललं. की आज आम्ही इथपर्यंत आलोय. हा बदल माइंडसेटचा आहे, हा बदल सेल्फ कॉन्फिडन्स आणि ट्र्स्टचा आहे. हा बदलाव गुड गव्हर्नेन्सचा आहे. एक जुनी म्हण आहे, मन के हारे हार है, मन के जीते जीत है.” या सोप्या शब्दात त्यांनी दहा वर्षांतील सरकारची यशोगाथा उलगडली.

मोदींचा विकासाचा रोडमॅप

  • आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे राहिलो. आपल्याला आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत जगाचं नेतृत्व करायचं आहे. भारतात रोज दोन नवे कॉलेज उघडले आहे, प्रत्येक आठवड्यााला एक विद्यापीठ उघडल्यांचं त्यांनी सांगितले.
  • भारतात रोज ३६नवे स्टार्टप बनले आहेत. भारतात रोज १६ हजार कोटी रुपयांचे यूएआय ट्रान्जेक्शन झालं आहे. भारतात रोज १४ किलोमीटर रेल्वे ट्रॅकचं निर्माण झालं आहे. भारतात रोज ५हजार हून अधिक एलपीजी गॅस कनेक्शन दिलं गेलं आहे, भारतात प्रत्येक सेकंदाला एका नळातून कनेक्शन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • भारतात रोज ७५ हजार लोकांना गरीबीतून बाहेर काढलं आहे. आपण नेहमीच गरिबी हटावचे नारे ऐकले. दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्रय रेषेतून बाहेर येतील याचा कुणी विचार केला होता. पण हे झालं आहे. आमच्याच सरकारमध्ये झालं आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या धोरणावर तिखट टीका

  • त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार प्रहार केला. अनेक योजना कशा अपूर्ण ठेवण्यात आल्या. वेळकाढूपणा करण्यात आला हे त्यांनी सादोहरण सांगितले. उत्तर प्रदेशात ८०च्या दशकात शरयू नहर परियोजनेचा शिलान्यास झाला होता. ही परियोजना चार दशके अटकली होती. २०१४मध्ये ही परियोजना आम्ही वेगाने पूर्ण केली. सरदार सरोवरचा शिलान्यास ६०च्या दशकात पंडित नेहरू यांनी शिलान्यास केला होता. ६० वर्षापर्यंत सरदार सरोवर डॅमचं काम असंच अडकलं होतं. सरकार बनल्यानंतर २०१७मध्ये आम्ही डॅम पूर्ण करून आम्ही लोकापर्ण केलं. महाराष्ट्रातील कृष्णा कोयना परियोजनाही सुद्धा ८० दशकात तयार झाली. ती अशीच लटकली होती. या डॅमचं कामही आमच्याच सरकारने पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितले.
  • गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही अटल टनेलच्या आसपास बर्फवृष्टी झाल्याचं तुम्ही पाहिलं. अटल टनेलही २००२मध्ये शिलान्यास झाला. २०१४पर्यंत काहीच घडलं नाही. त्याचं कामही आमच्या सरकारने पूर्ण केलं. त्याचं २०२०मध्ये लोकार्पण केलं. आसामचा बोगी बिल ब्रिज बी १९८८ मध्ये स्वीकृत झाला. आम्ही सरकार येताच २० वर्षात तो पूर्ण केला. इस्टंट डेडिकेटेड फ्रेड कॅरिडोरही आम्ही १५ वर्षानंतर पूर्ण केला. मी असे कमीत कमी ५०० प्रकल्प सांगू शकतो. अशा शेकडो प्रकल्प आम्ही हे पूर्ण केले. पंतप्रधानांनी काँग्रेसच्या काळातील प्रकल्प कसे झटपट पूर्ण झाले याची माहिती दिली.

हीच तर मोदी गॅरंटी

  • मी आमच्या सरकारची काही उदाहरणे देतो. मुंबईचा अटल सेतू देशातील सर्वात मोठा सी ब्रीज. त्याचा शिलान्यास २०१६मध्ये झाला. त्याचं उद्घाटन केलं. संसदेची नवी इमारत तयार केली. जम्मू एम्स तयार केलं. राजकोट एम ही पूर्ण केलं. त्रिची एअरपोर्टचंही लोकार्पण झालं. आयआयटी भिलाईचा शिलान्यास झाला आणि लोकार्पण केलं. गोव्याच्या नव्या विमानतळाचं लोकार्पण केलं. लक्षद्वीपमध्ये ऑप्टिकल फायबर बसवले. हे काम कठिण होतं. काही आठवड्यापूर्वीच आम्ही पूर्ण केलं.
  • कालच द्वारकेत सुदर्शन सेतूची फोटो पाहिले. देशाचं हा ब्रीज आम्ही शिलान्यास केला. तो पूर्ण केला. मी मोदी गॅरंटी म्हणतो ना ती हीच आहे. ही स्पीड जेव्हा असते, वेगाने काम करण्याची इच्छा असते आणि टॅक्सपेअरच्या पैशाचा सन्मान असतो, तेव्हा देश मोठी झेप घ्यायला तयार असतो. भारत ज्या वेगाने पुढे जात आहे, ते कल्पनेच्या पलिकडे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

गरिबी सिंगल डिजिट

भारतात कन्झम्प्शनबाबतचा रिपोर्ट आला आहे. त्यातून नवा ट्रेंड कळतो. भारतातील गरिबी आता सिंगल डिजीटला आली आहे. या डेटा नुसार कन्झम्प्शन अडीच टक्के वाढलं आहे. गेल्या दहा वर्षात गावात कन्झम्प्शन अधिक वाढलं आहे. म्हणजे गावातील लोकांचं आर्थिक सामर्थ वाढत आहे. हे असंच झालं नाही. २०१४ नंतर आम्चया सरकारने गावाला समोर ठेवून इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं. महिलांचं उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केला. विकासाच्या या मॉडेलमुळे भारत सशक्त झाला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.