EPFO : कर बचतीसाठी पीपीएफ सर्वाधिक प्रभावी, व्याजदर ते कर सवलत; जाणून घेऊया सर्व लाभ

पीपीएफ योजनेतून तीन स्तरावर कर लाभ प्राप्त होतात. पहिल्या टप्प्यात गुंतवणूक रकमेवर, त्यानंतर व्याजाच्या रकमेवर आणि तिसऱ्या टप्प्यात एकूण मॅच्युरिटी रकमेवर कर सवलत प्राप्त होते.

EPFO : कर बचतीसाठी पीपीएफ सर्वाधिक प्रभावी, व्याजदर ते कर सवलत; जाणून घेऊया सर्व लाभ
कर बचतीसाठी पीपीएफ सर्वाधिक प्रभावीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:18 PM

नवी दिल्लीगुंतवणुकदारांचा सर्वाधिक कल भविष्य निर्वाह निधीत (Public provident fund) गुंतवणूक करण्याकडे असतो. पीपीएफ ही दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) योजना मानली जाते. सर्वोत्तम परताव्यासोबत सुरक्षित गुंतवणुकीची हमी पीपीएफच्या माध्यमातून मिळते. गुंतवणुकदारांचे पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याचे मुख्य उद्दिष्ट कर सवलतीचा मिळणारा लाभ मानले जाते. पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याद्वारे कर सवलत प्राप्त होते. कलम 80-सी अन्वये कर वजावटीस पात्र ठरते. मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या रकमेवरील व्याज देखील करमुक्त असते. त्यासोबतच मॅच्युरिटीची एकूण रक्कम (Maturity Ammount) पूर्णपणे करमुक्त असते. पीपीएफ योजनेतून तीन स्तरावर कर लाभ प्राप्त होतात. पहिल्या टप्प्यात गुंतवणूक रकमेवर, त्यानंतर व्याजाच्या रकमेवर आणि तिसऱ्या टप्प्यात एकूण मॅच्युरिटी रकमेवर कर सवलत प्राप्त होते.

पीपीएफ मधून पैसे कधी:

· खाते उघडल्यानंतर सातव्या वर्षापासून आंशिक स्वरुपातून पैसे काढले जाऊ शकतात

· प्रत्येक आर्थिक वर्षात केवळ एकदाच आंशिक विद्ड्रॉल केले जाऊ शकते

· तुमच्या पीपीएफ खात्याची पूर्ण रक्कम केवळ मॅच्युरिटी वेळीच काढली जाऊ शकते.

· पीपीएफ खाते उघडल्यानंतर 15 वर्षानंतर खात्याची मॅच्युरिटी असते.

व्याज कसे मिळते?

भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढण्यासाठी अर्ज केल्यास त्याची स्थिती तपासणे देखील महत्वाचे आहे. मॅच्युरिटीनंतर पीपीएफ खात्यात पैसे जमा होतात. खात्यात जमा झालेल्या पैशाच्या स्थितीविषयी ईमेल किंवा फोनच्या माध्यमातून माहिती मिळत नाही. तुम्ही पीपीएफ खाते ऑनलाईन उघडले असल्यास त्याच्या क्लेमची स्थिती देखील ऑनलाईनच तपासावी लागते. तुम्हाला पीपीएफ खात्यात लॉग-इन करावे लागेल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. तुमचं पीपीएफ खातं बँकेत असले तरीही तुम्हाला स्थिती ऑनलाईनच तपासावी लागते.

पीपीएफ क्लेम स्थिती ऑनलाईन:

· तुमचे पीपीएफ खाते असलेल्या बँकेत पीपीएफ नेट बँकिंग सोबत जोडण्यासाठी फॉर्म भरा

· तुम्हाला नेट बँकिंगचा यूजर आयडी प्राप्त होईल. तुम्ही पासवर्ड बनवून घ्या. बँकेच्या नेट बँकिंगमध्ये लॉग-इन करा. त्यानंतर तुमच्या पीपीएफ क्लेम स्थिती प्रक्रियेला सुरुवात होईल.

· तुम्हाला क्लेमची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळी लॉग-इन करणे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर क्लेम प्रक्रियेला सुरुवात करता येईल.

· काही बँका पीपीएफ डिपॉझिट केवळ ऑनलाईनच जमा करतात. त्यामुळे पीपीएफ विद्ड्रॉल स्थिती केवळ ऑनलाईनच जाणून घेता येईल

· तुमचं पीपीएफ खातं पोस्टात असल्यास तुम्ही थेट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्थिती विषयी माहिती जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.