AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांच्या रडारवर 823 यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर, प्रत्येकाची कुंडली शोधणं सुरू

पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण करणाऱ्या युट्यूबर्स आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्सवर कारवाई सुरू केली आहे. ज्योती मल्होत्रा यांच्या प्रकरणानंतर, 823 युट्यूबर्स आणि ब्लॉगर्सवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. हे लोक सीमावर्ती भाग, धार्मिक स्थळे आणि संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ शेअर करून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत.

पोलिसांच्या रडारवर 823 यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर, प्रत्येकाची कुंडली शोधणं सुरू
पोलिसांच्या रडारवर यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्सImage Credit source: social media
| Updated on: May 20, 2025 | 1:52 PM
Share

युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एकूण 11 लोकांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. तर आता इतर युट्यूबर्स आणि ट्रॅव्हल ब्लॉगर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. एकट्या पंजाबमधील 823 यूट्यूबर्स आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्सवर पोलिसांनी लक्ष्य केंद्रीत केलं आहे. ज्यांच्या यूट्यूब चॅनेल्स आणि ब्लॉग्सवर पाकिस्तानशी संबंधित कंटेंट आहे आणि जो शेजारी देशांमध्ये अधिक पसंत केला जातो, अशा कंटेंटची आता पोलीस तपासणी करणार आहेत. केवळ पाकिस्तानशी संबंधित कंटटे त्यांच्या यूट्यूबवर किंवा ब्लॉग्सवर आहे म्हणून ते पोलिसांच्या रडारवर आलेले नाहीत, तर हे लोक राज्यातील सीमावर्ती भाग, धार्मिक स्थळे, कॉरिडॉर्स आणि अत्यंत संवेदनशील लष्करी ठिकाणे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरातील व्हिडिओ कंटेंट शेअर करत असल्याने ते पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

व्हिडिओ कंटेंटद्वारे सीमावर्ती भाग आणि संवेदनशील ठिकाणांची सद्यस्थिती उघड करून, ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीत, पंजाब पोलीस केवळ या 823 यूट्यूबर्स आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्सची संपूर्ण माहिती गोळा करत नाहीयेत, तर त्यांचा सर्व कंटेंट बारकाईने पाहिला जात आहे.

तर धोका होऊ शकतो

पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष तांत्रिक तज्ज्ञांची एक टीम या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे. पाकिस्तानशी लागून असलेली पंजाबची 553 किमी लांब सीमा असलेल्या भागात अनेक लष्करी तळे आणि संवेदनशील ठिकाणे आहेत. अशा ठिकाणांची माहिती जर सार्वजनिक झाली, तर ती राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका ठरू शकते. त्यामुळे आता पोलीस त्यांच्या पातळीवर या यूट्यूबर्स आणि ब्लॉगर्सची चौकशी करत आहेत, असं गौरव यादव यांनी सांगितलं.

त्या व्हिडिओंची चौकशी सुरू

2019 मध्ये करतारपूर कॉरिडॉरचे देखील सर्वेक्षण करण्यात आले होते. पोलिसांनी हिसार येथील यूट्यूबर जोती मल्होत्राच्या संपर्कांचीही चौकशी सुरू केली आहे, जिच्यावर गुप्तचर कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. 2019 मध्ये देशभरातील अनेक मोठे यूट्यूबर्स आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्स करतारपूरमध्ये आले होते. तपास यंत्रणांच्या अहवालात अनेक संवेदनशील मुद्दे समोर आले असून, यावर काम सुरू आहे. यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, करतारपूर कॉरिडॉरवर अनेक वर्षांपासून विशेष नजर ठेवली जात आहे, कारण या मार्गाने अनेकदा गुप्तचर माहिती मिळालेली आहे.

121 सोशल मीडिया अकाऊंट्स बंद

पंजाब पोलिसांनी 10 एप्रिल 2025 पर्यंत एकूण 121 सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केले आहेत. हे अकाऊंट्स परदेशात असलेल्या गँगस्टर्स आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित पोस्ट्समधून माहिती शेअर करण्यासाठी आणि संवादासाठी माध्यम म्हणून वापरले जात होते. यात पाकिस्तानस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख हरविंदर सिंग उर्फ रिंदा, हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी पासियन, जीवन फौजी, अनमोल बिश्नोई, गोल्डी बरार आणि इतर गँगस्टर्सचे सोशल मीडिया अकाऊंट्स समाविष्ट होते.

पंजाब पोलिसांनी हे अकाऊंट्स बंद केल्यावर अहवालात महत्त्वाची नोट लिहिली होती. पाकिस्तानी एजन्सी ISI चे सदस्य या अकाऊंट्सवर सक्रीय होते, असं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी पंजाब पोलिसांनी 483 सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केले होते, जे गँगस्टर्सशी संबंधित होते, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.