पाकिस्तानशी तणावादरम्यानच सेनेला मिळणार घातक हत्यार, घरातूनच दुश्मनाला करेल उद्ध्वस्त
भारतीय लष्कर लवकरच राफेल लढाऊ विमानांमध्ये ब्रह्मोस-एनजी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तैनात करण्याची तयारी करत आहे. 290 किमीचा पल्ला आणि ताशी 4170 किमी वेग असलेले हे क्षेपणास्त्र शत्रूच्या ठिकाणांना अचूकपणे लक्ष्य करेल. डिसॉल्ट एव्हिएशन या एकत्रीकरणाला मान्यता दिली आहे, ज्यामुळे 'मेक इन इंडिया'मोहिमेला चालना मिळेल.

पहलगाम हल्ल्यानंतर देशात तणावाचे वातावरण असून दुसरीकडे पाकिस्तानचा कांगावा आणि कुरापतीही वाढल्या आहेत. मात्र याच दरम्यान भारतासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारताच्या हवाई शक्तीला लवकरच एक घातक धार मिळणार आहे. भारतीय हवाई दल आणि नौदल त्यांच्या राफेल लढाऊ विमानांमध्ये ब्रह्मोस-एनजी (नेक्स्ट जनरेशन) सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तैनात करण्याची तयारी करत आहेत. 290 किलोमीटरचा पल्ला आणि 4170 किमी/तास वेगाने उड्डाण करणारे हे क्षेपणास्त्र शत्रूवर अचूक आणि विनाशकारी प्रहार करण्यास सक्षम असेल.
डिसॉल्ट एव्हिएशनने राफेलमध्ये भारताच्या स्वदेशी शस्त्र प्रणालींचे एकत्रीकरण करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे ‘मेक इन इंडिया’मोहिमेलाही नवीन बळ मिळेल आणि भारताचे रणनैतिक स्वातंत्र्य आणखी मजबूत होईल.
यामुळे पाकिस्तानचे टेन्शन मात्र वाढलं आहे. कारण पाकिस्तानला आधीच भारताच्या राफेल ताफ्याची चिंता होती. आता जेव्हा या अत्याधुनिक लढाऊ विमानांमध्ये ब्रह्मोस-एनजी सारख्या घातक क्षेपणास्त्रे बसवली जातील, तेव्हा त्याचा त्यांच्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या धोरणावर ( टेरर-सपोर्टिंग रणनीति) मोठा परिणाम होईल. आता भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याच्या शत्रूच्या प्रयत्नांना दिले जाणारे प्रत्युत्तर अधिक जलद, अधिक अचूक आणि प्राणघातक असेल.
राफेल हे पाकिस्तानच्या JF-17 सारख्या विमानांपेक्षा अनेक पटीने अधिक सक्षम आहे आणि ब्रह्मोस-एनजीच्या समावेशानंतर ते एक धोरणात्मक स्ट्राइक प्लॅटफॉर्म बनेल. विशेष म्हणदे सीमा ओलांडल्याशिवाय, हे क्षेपणास्त्र पाकिस्तानमधील कोणत्याही लष्करी तळाला, कमांड सेंटरला किंवा दहशतवादी लाँचपॅडला क्षणार्धात लक्ष्य करू शकते
2026 मध्ये चाचणी, लखनऊ मधून उत्पादन
या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 2026 मध्ये होईल आणि ते उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे बांधल्या जाणाऱ्या ब्रह्मोस उत्पादन केंद्रात तयार केले जाईल. हे केंद्र क्षेपणास्त्र उत्पादनात भारताच्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे.
ब्रह्मोस-NG, ही ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची हलकी आणि प्रगत आवृत्ती आहे, जी विशेषतः आधुनिक लढाऊ विमाने आणि मोबाइल प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपित करण्यासाठी विकसित केली जात आहे.
स्पीड : ब्रह्मोस-एनजीचा वेग मॅक 3.5 (सुमारे 4170 किमी/तास) आहे, ज्यामुळे तो शत्रूच्या रडार आणि संरक्षण प्रणालींना चुकवून अचूकतेने हल्ला करू शकतो.
रेंज (Range) : त्याची रेंज 290 किलोमीटर आहे, म्हणजेच हे मिसाईल सीमा ओलांडल्याशिवायच सीमेपलीकडे असलेल्या शत्रूंच्या महत्त्वाच्या तळांना नष्ट करू शकते.
हलके आणि कॉम्पॅक्ट डिझाईन : त्याचे वजन सुमारे 1.5 टन आहे, जे मूळ ब्राह्मोस क्षेपणास्त्रापेक्षा सुमारे 50 टक्के कमी आहे. त्यामुळे, तेजस एमके१ए, राफेल, मिराज-2000, सुखोई-30एमकेआय सारख्या लढाऊ विमानांमधून ते सहजपणे डागता येते.
अचूकता: ब्रह्मोस-NGचा स्ट्राइक अचूकता सेमी -ॲक्टिव्ह लेसर आणि इनर्शियल GPS/GLONASS नेव्हिगेशन सिस्टमवर आधारित आहे, ज्यामुळे ते हाय-प्रिसिजन स्ट्राइक शस्त्र आहे.
लो रडार सिग्नेचर : हे गुप्त वैशिष्ट्यांसह डिझाइन केले गेले आहे, ज्यामुळे ते शत्रूच्या रडारसाठीला अदृश्य असेल.
फाइटर जेटद्वारे डिप्लॉयमेंट : एका लढाऊ विमानावर एकाच वेळी दोन क्षेपणास्त्रे वाहून नेली जाऊ शकतात, ज्यामुळे एकाच उड्डाणात दोन वेगवेगळ्या लक्ष्यांवर हल्ला करणे शक्य होते.
लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठी योग्य : हे क्षेपणास्त्र हवेतून सोडले जाणारे, जमिनीवरून आणि जहाजावरून मारा करणारे आवृत्त्यांमध्ये उपलब्ध असेल. याचा अर्थ जमीन, पाणी आणि आकाश – प्रत्येक आघाडीवर समान प्राणघातक शक्ती असेल
