VIDEO: काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते, म्हणूनच पवारांचा टेकू; रावसाहेब दानवेंची फटकेबाजी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावं, असं विधान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं. थोरात यांच्या या विधानाची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खिल्ली उडवली आहे. (raosaheb danve taunt balasaheb thorat over join congress offer to sharad pawar)

VIDEO: काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते, म्हणूनच पवारांचा टेकू; रावसाहेब दानवेंची फटकेबाजी
raosaheb danve


नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावं, असं विधान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं. थोरात यांच्या या विधानाची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खिल्ली उडवली आहे. काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते. म्हणूनच पवारांनी त्या माडीला टेकू दिला आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. (raosaheb danve taunt balasaheb thorat over join congress offer to sharad pawar)

रावसाहेब दानवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही फटकेबाजी केली. शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिलेला आहे. तुमची माडी कधीही पडू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे, असं सांगतानाच बाळासाहेब थोरातांची ऑफर हस्यास्पद आहे. पवारांनी टेकू काढून घेतला तर काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते, अशी खोचक टीका दानवे यांनी केली आहे.

चव्हाण, लालूंची चौकशी काँग्रेसच्याच काळात

यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरूनही भाष्य केलं. ईडी आणि सीबीआय ही काँग्रेसची देण आहे. काँग्रेसच्या काळातच अशोक चव्हाण यांची सीबीआय चौकशी झाली होती. लालू प्रसाद यादव यांची चौकशी झाली होती. आपल्याच लोकांना काँग्रेसने टार्गेट केलं होतं, असं सांगतानाच यंत्रणांना तक्रारी मिळतात. त्यानुसार ते कारवाई करतात. सर्व यंत्रणा या स्वतंत्र यंत्रणा आहेत, असं त्यांनी सांगितलं.

ओबीसींनाच उमेदवारी देऊ

केंद्र सरकारने राज्यांना ओबीसी आरक्षणाबाबतचा अधिकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता त्याबाबतची पावलं उचलण्याची गरज आहे, असं सांगतानाच भाजप आधी ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागेवर ओबीसींना उमेदवारी देईल. अनेक ठिकाणी तर आधीच फॉर्म भरण्यात आले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तेव्हा शेतकऱ्यांसाठी चांगलं वातावरण होतं

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. कोरोना काळ सोडला तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी चांगलं वातावरण होतं, असंही त्यांनी सांगितलं.

वडेट्टीवारांकडून समर्थन

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांच्या विधानाचं समर्थन केलं होतं. खरंतर सर्व विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर मूळ काँग्रेसच्या विचारधारेतूनच निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे आपण आपसात मतभेद ठेवण्यापेक्षा, टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आणि एकमेकांना दुखावण्यापेक्षा एकमेकांच्याविरोधात बोलण्यापेक्षा एकत्रं आलं पाहिजे. आपण एकाच विचारधारेचे आहोत. अशावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन शक्ती वाढवावी ही भूमिका योग्यच आहे, असं वडेट्टीवार म्हणाले होते. (raosaheb danve taunt balasaheb thorat over join congress offer to sharad pawar)

संबंधित बातम्या:

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही

राज्य सरकारचीही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता?; भुजबळ नेमकं काय म्हणाले?

रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात एफआयआर दाखल करणार; हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकले

(raosaheb danve taunt balasaheb thorat over join congress offer to sharad pawar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI