प्रीती अश्लील चाळे करायची… आईने घातल्या शिव्या; गद्दार रवी वर्मा प्रकरणात धक्कादायक खुलासे
रवी वर्मा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. रवीच्या आईने देखील पाक ISI एजंटला शिव्या घातल्या होत्या.

महाराष्ट्र एटीएसने भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली ठाण्यातील रविकुमार वर्माला अटक केली. पोलीस त्याची कसून चौकशी करताना दिसत आहेत. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रीती नावाच्या मुलीने रवीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर रवीच्या आईने देखील तिला फोन करुन शिवीगाळ केली होती. आता ही प्रीती नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
एटीएसने अटक केलेल्या रवी वर्माला हनी ट्रॅप प्रकरण्यात अडकवण्यात आले होते. रवींद्र वर्मा बरोबर संभाषण करण्याकरिता पाक एजंटने भारतीय सिमकार्डचा वापर केला होता असा तपासा मध्ये समोर आलेला आहे. रवीला हनीट्रॅप प्रकरणात पाक एजंट प्रीती सिंघलने अडकवले होते. हळूहळू त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली होती. प्रिती सिंघल अश्लिल चाळे करायची हे रवीच्या आईला माहिती पडले होते. त्यामुळे रवीची आई रेखा वर्मा यांनी प्रीती सिंघलला फोनवरुन शिव्या दिल्या होत्या.
वाचा: वेगवेगळे सिमकार्ड, ‘सर’ नावाच्या व्यक्तीशी संपर्क; ठाण्यातील गद्दार रवी वर्माबाबत मोठी अपडेट
रवी आणि प्रीती यांच्यामधील भांडणे आईपर्यंत पोहोचली होती. तसेच काही पाकच्या ISI एजंटला देखील कळाली होती. त्यामुळे त्यांची भांडणे सोडवण्यासाठी सिंघल सर नावाच्या एका पाक ISI एजंटने मध्यस्थी केली होती. नंतर रवी वर्मा या पाक ISI एजन्टशी सतत संपर्कात असायचा. त्यांच्यामध्ये बोलणे सुरु असायचे अशी माहिती तपासात समोर आली आहे.
रवी वर्मावर काय आहेत आरोप?
एटीएसने अटक केलेला रवी वर्मा नोव्हेंबर 2024 पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात आला होता. पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी या दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुकची नावे आहेत. याच फेसबुक अकाऊंटवर रवी वर्माने तब्बल १४ सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाठवली. युद्धनौका तसेच इतर जहाजाची महत्त्वाची माहिती आणि चित्रही बनवून पाकिस्तानला पाठवली होती. नेव्हल डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने आरोपी रवी वर्मा तिथल्या युद्धनौकांचे स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवायचा. त्यानंतर ती संपूर्ण माहिती पायल शर्मा आणि इस्प्रीत या अकाउंटला पाठवायचा. तो ही माहिती ऑडियो आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाठवायचा असेही तपासात समोर आले आहे.
