Rawat Helicopter Crash: आणखी 90 सेकंद असते तर रावत अजूनही देशाची कमान सांभाळत असते, नेमकं काय घडलं दीड मिनिटात?

यात रावत यांच्या पत्नी मधूलिकाही आहेत. ते 90 सेकंद टळले असते तर मृत्यूचं तांडव टळलं असतं असं आता लष्करी अधिकारी सांगतायत. देशानं एक कर्तबगार लष्करी अधिकारी त्या 90 सेकंदात गमावला.

Rawat Helicopter Crash: आणखी 90 सेकंद असते तर रावत अजूनही देशाची कमान सांभाळत असते, नेमकं काय घडलं दीड मिनिटात?
90 सेकंद मिळाले असते तर जनरल रावतसह सर्व जण आता जीवंत असते.
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 7:17 AM

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा (CDS Bipin Rawat Helicopter crash) अपघात नेमका कसा झाला याची सविस्तर चौकशी होईलच पण प्राथमिक माहिती जी हाती आलीय त्यानुसार रावत ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, त्याला अवघे 90 सेकंद आणखी मिळाले असते तर कदाचित ते वाचले असते. फक्त तेच नाही तर त्यांची पत्नी मधूलिका रावत, तसच इतर 11 जणांचाही जीव वाचला असता. पण कदाचित एखाद्या घटनेला अपघात त्यामुळेच म्हणत असावेत. बघता बघता, अनपेक्षीतपणे काही तरी घडतं आणि काही सेकंदाच्या आत होत्याचं नव्हतं होतं. जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताबद्दलही तेच झालेलं दिसतंय. ते 90 सेकंद महत्वाचे सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ रावत हे आज दिल्लीहून वेलिंग्टन डिफेन्स कॉलेजला गेले होते. त्यासाठी ते पहिल्यांदा कोईंबतूरला जाण्यासाठी सुलूर एअरफोर्स बेसला पोहोचले. त्यासाठी त्यांनी इंडियन एअरफोर्सच्या एम्ब्रेयर (Indian Airforce Helicopter) एअरक्राप्टनं प्रवास पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी कुन्नूरच्या वेलिंग्टनला जाण्यासाठी सुलूरहून रवाना झाले. त्यासाठी MI-17V5 हेलिकॉप्टरवर ते सवार झाले. सुलूर ते वेलिंग्टन हा फ्लाईटनं अंतर आहे 56 किलोमीटर. त्यासाठी साधारपणे 34 मिनिट लागतात. जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरनं 32 मिनिटांचा प्रवास पूर्णही केला. सगळं काही वेळेवर चाललेलं होतं. लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते. त्यांना जिथं पोहोचायचं होतं, ते ठिकाण फक्त 10 किलो मीटरवर होतं. जनरल रावतसह सर्वांनाच आता आपण दीड ते दोन मिनिटात लँड होऊ असं वाटत असतानाच, हेलिकॉप्टरमध्ये काही तरी बिघाड झाला आणि ते खाली कोसळलं. त्यात जनरल रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधूलिका, ब्रिगेडीयर एल एस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदरसिंहसुद्धा होते. काही पर्सनल सेक्युरिटी अधिकारी होते. एकूण हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. फक्त एक जण वाचू शकला. त्यांनाही गंभीर जखमा आहेत.

अपघात कसा झाला? वातावरण खराब होतं. परिसर घनदाट जंगलाचा आणि निमुळता होता. हेलिकॉप्टरमध्ये लँडींगला अवघे दीड ते दोन मिनिट शिल्लक असतानाच बिघाड झाला. हेलिकॉप्टरनं घिरक्या घेतल्या आणि ते जंगलात कोसळलं. त्याचा खाली येण्याचा वेग एवढा जबरदस्त होता की, कोसळताना त्याच्यामुळे झाडं कापली गेली. ओल्या झाडांना आग लागली. त्या आगीत हेलिकॉप्टरमधले बहुतांश जण कोसळले. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलं, तिथं सर्वात आधी गावकरी पोहोचले. त्यांनी आग विझवण्याचा आधी प्रयत्न केला. काहींना मोबाईल शूटही करत होते. पण काही मृतदेहांना जाग्यावरच आग लागलेली होती. नेमकं कोणतं हेलिकॉप्टर आहे, आत असलेले अधिकारी कोण आहेत कुणालाच अंदाज नव्हता. गावकरी फक्त कुणाला कसं वाचवता येईल हेच बघत होते. थोड्याच वेळात टीव्हीवर, सोशल मीडियावर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे व्हिडीओ फोटो सर्क्युलेट झाले आणि गावकऱ्यांना देशातल्या सर्वोच्च अधिकाऱ्याचा अंदाज आला. थोड्याच वेळात जखमींना वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण 85 टक्क्यापेक्षा जास्त भाजल्यानं रावतसह 13 जणांचा मृत्यू झाला. यात रावत यांच्या पत्नी मधूलिकाही आहेत. ते 90 सेकंद टळले असते तर मृत्यूचं तांडव टळलं असतं असं आता लष्करी अधिकारी सांगतायत. देशानं एक कर्तबगार लष्करी अधिकारी त्या 90 सेकंदात गमावला.

हे सुद्धा वाचा: Nashik| बाजार समितीवर प्रशासक नाही, सध्याचे संचालक मंडळच कामकाज बघणार, निवडणुका वेळापत्रकानुसार घेण्याचे आदेश

Aurangabad: फुलंब्रीत ऐन थंडीत राजकारण तापले, निवडणुकांचा धडाका, प्रभाग रचना, आरक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष!

दुधाळ जनावरांपासून उत्पादन वाढविण्याची शेतकऱ्यांना संधी, अनुदानावर मिळणार गाई-म्हशी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.