आप सगळीकडे काँग्रेसची जागा घेतंय? गोव्यात भाजपला कडवं आव्हान देण्याच्या तयारीत, वाचा काय आहे नवा सर्व्हे?

सर्वेक्षणानुसार 40 सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 4 ते 8 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप 39.4 टक्के मतांसह परत येईल अशी अपेक्षा आहे.

आप सगळीकडे काँग्रेसची जागा घेतंय? गोव्यात भाजपला कडवं आव्हान देण्याच्या तयारीत, वाचा काय आहे नवा सर्व्हे?
आप सगळीकडे काँग्रेसची जागा घेतंय? गोव्यात भाजपला कडवं आव्हान देण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 11:14 PM

गोवा : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमताने सत्तेत परतू शकतो. मात्र आम आदमी पार्टी (आप) राज्यात एक प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे, जो मुख्य विरोधी पक्षासाठी काँग्रेसला कडवी लढत देईल. टाईम्स ऑफ इंडियाने एबीपी-सीव्हीटर-आयएएनएस बॅटल फॉर द स्टेट्स प्रोजेक्शनचे हवाले देत म्हटले आहे की, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष भाजप आरामात सत्ता राखेल. (Ready to give a tough challenge to BJP in Goa, read the new survey)

काय आहे सर्वेक्षणात?

हे सर्वेक्षण पाच राज्यांतील 690 विधानसभा जागांवरील 81,006 लोकांसोबत करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, गोव्यात भाजपचा वाटा 2017 मध्ये 32.5 टक्क्यांवरून 2022 मध्ये 39.4 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये 15.9 टक्क्यांवरून 6.3 टक्के वाढीसह 2022 मध्ये आपचा मतांचा हिस्सा 22.2 टक्के होण्याची अपेक्षा आहे. कॉंग्रेसचा मतांचा हिस्सा 2017 मध्ये 28.4 टक्क्यांवरून 2022 मध्ये 13 टक्क्यांवर येऊन 15.4 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणानुसार 40 सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 4 ते 8 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप 39.4 टक्के मतांसह परत येईल अशी अपेक्षा आहे.

प्रमोद सावंत सर्वात प्रबळ दावेदार

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री 2022 मध्ये प्रबळ दावेदार असणार आहेत. सर्वेक्षणादरम्यान, सुमारे 33.2 टक्के लोकांनी सांगितले की, प्रमोद सावंत ही त्यांची पहिली पसंती आहे. या सर्वेक्षणातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाने राज्यात अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही, परंतु 13.8 टक्के लोकांनी सांगितले की, मुख्यमंत्री पदासाठी आपचा उमेदवार ही त्यांची पहिली पसंती आहे. सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, भाजप सरकारच्या कामगिरीवर जास्त लोक समाधानी आहेत.

गोव्यात पाण्याचे बिल माफ झाले

काही दिवसांपूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते की लोकांना 16,000 लिटर पाणी मोफत दिले जाईल. 1 सप्टेंबरपासून 60 टक्के कुटुंबांना शून्य बिल मिळेल. फ्लॅट किंवा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्याचबरोबर त्यांनी छोट्या उद्योगांसाठी एक घोषणाही केली आहे. ते म्हणाले, रेस्टॉरंट्सना यापुढे औद्योगिक बिले(Industrial bills) भरावी लागणार नाहीत. आम्ही हे व्यावसायिक बिल स्लॅबमध्ये देत आहोत, ते मोठ्या प्रमाणात पैसे वाचवू शकतील. ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) 2 महिन्यांसाठी वाढविण्यात आले आहे जेणेकरून प्रलंबित बिले भरणे सुलभ होईल.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे म्हणाले होते, ‘लोकांना मोफत पाणी देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असेल, आम्ही हे पाणी वाया घालवत नाही, आम्हाला मोफत पाणी मिळवण्यासाठी पाणी वाचवायचे आहे. तसेच, अलीकडेच गोवा सरकारचे ‘गोवा भूमिपुत्र प्राधिकरण विधेयक, 2021’ नावामुळे वादात सापडले. अशा स्थितीत राज्यातील काही समाजांकडून वाढता विरोध पाहून सरकारने विधेयकातून ‘भूमिपुत्र’ हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. (Ready to give a tough challenge to BJP in Goa, read the new survey)

इतर बातम्या

वीज कोसळली अन् सगळं नेस्तनाबूत, तब्बल 100 मेंढ्यांचा जागीच मृत्यू, आम्ही जगावं तरी कसं ? मेंढपाळांचा प्रश्न

50MP कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.