कमालच झाली, कोविड लॉकडाऊनचा चंद्रावरही परीणाम, संशोधकांचा मोठा दावा
कोरोनादरम्यान पृथ्वीवर झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही देखील झाला होता असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.
कोविड-19 साथीमुळे जगभरात लॉकडाऊन लागू झाले तेव्हा अनेक बदल घडले. लॉकडाऊन दरम्यान वाहतूक ठप्प झाल्याने प्रदुषणात मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्यामुळे तापमानात घट झाली होती. त्यावेळी अनेक पक्षी देखील पाहायला मिळाले. मात्र, पृथ्वीवरील या घडामोडीचा थेट चंद्रावर देखील परिणाम झाल्याचा आढळले आहे. ज्यावेळी कठोर लॉकडाऊन सुरु झाले तेव्हा चंद्राचे तापमान सामान्यांहून कमी झाले होते. असा दावा रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या स्टडीमध्ये करण्यात आला आहे.
साल 2017 पासून 2023 दरम्यानचा चंद्रावरील वेगवेगळ्या पृष्टभागावरील तापमानाचा आढावा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे दुर्गा प्रसाद आणि जी आंबिली यांनी घेतला तेव्हा त्यांना काही आर्श्चयकारक बाबी आढळल्या. पीआरएलचे संचालक अनिल भारद्वाज यांच्या मते त्यांच्या गटाने एक महत्वाचे काम केले आहे. आणि हा वेगळ्या प्रकारचा शोध त्यांनी लावला आहे. या संशोधनात आढळले की अन्य वर्षांच्या तुलनेत लॉकडाऊनवाल्या वर्षांत सामान्याहून 8 ते 10 केल्विन तापमान कमी आढळले.
संशोधकांच्या मते लॉकडाऊन सुरु झाले तेव्हा पृथ्वीवरील दैनंदिन जीवन ठप्प झाल्याने येथील रेडीएशन कमी झाले. याचा परिणाम चंद्रावर देखील पाहायला मिळाला. साल 2020 मध्ये चंद्रावरील तापमान देखील घटले. त्यानंतर दोन वर्षांनी कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर पून्हा चंद्राच्या तापमानात वाढ झाली. कारण पृथ्वीवर पुन्हा वाहनांची गर्दी आणि प्रदुषण सुरु झाले होते. नासाच्या लुनार ऑर्बिटरकडून डेटा काढल्यानंतर हा अभ्यास करण्यात आला. टाइम्स ऑफ इंडीयाच्या अहवालानुसार प्रसाद यांनी सांगितले की या अभ्यासासाठी सात वर्षांचा डेटा गोळा करण्यात आला. यात साल 2020 च्या तीन वर्षांच्या आधी आणि तीन वर्षांनंतरच्या तापमानाचा डेटा तपासण्यात आला आहे. पृथ्वीवर दैनंदिनी घडामोडींवर ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन वाढत आहे. यानंतर पृथ्वीच्या वातावरणाने होणार्या रेडीएशनमुळे चंद्राच्या तापमानात देखील परिणाम झालेला आहे.
आणखी डेटाची गरज
चंद्र पृथ्वीच्या रेडीएशनच्या ऐप्लिफायर म्हणून काम करीत असतो. या संशोधनात आपण पाहू शकता की मानव कशाप्रकारे चंद्राच्या तापमानावर देखील परिणाम करू शकतो. सोलर एक्टीव्हीटी आणि सिजनल फ्लक्स व्हेरीएशनमुळे चंद्राचे तापमान प्रभावित होते. लॉकडाऊनमुळे चंद्रावर झालेला हा परिणाम पृथ्वीवरील शांततेमुळे झालेला आहे. पृथ्वीवरील रेडीएशनमधील बदल आणि चंद्राच्या पृष्टभागावरील होणारे बदल याचा संबंध अभ्यासण्यासाठी आणखी डेटाची आवश्यकता असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे.