‘हनीमून पॉलिटिक्स’वर लालूपुत्र लालबूंद; ‘या’ नेत्याला दिला ‘पोलखोल’चा इशारा

राजद नेते तेजस्वी यादव यांचं राजकारण 'हनीमून पॉलिटिक्स' सारखं असल्याची टीका माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केली होती. (RJD Attacks Jitan Ram Manjhi On Honeymoon politics Statement)

'हनीमून पॉलिटिक्स'वर लालूपुत्र लालबूंद; 'या' नेत्याला दिला 'पोलखोल'चा इशारा
Tejpratap health update

पाटणा: राजद नेते तेजस्वी यादव यांचं राजकारण ‘हनीमून पॉलिटिक्स’ सारखं असल्याची टीका माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केली होती. मांझी यांच्या या टीकेवर तेजस्वी यांचे मोठे बंधू तेजप्रताप यादव चांगलेच भडकले आहेत. तुमच्या वयाचं भान राखा, नाही तर पोलखोल करेल, असा इशाराच तेजप्रताप यादव यांनी मांझी यांना दिला आहे. (RJD Attacks Jitan Ram Manjhi On Honeymoon politics Statement)

तेजप्रताप यादव यांनी हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझींविरोधात जोरदार हल्लाबोल केला. जीतनराम मांझी माझ्या बंगल्याच्या बाजूलाच राहतात. त्यामुळे त्यांच्या बंगल्यात ते काय काय करतात हे मला माहीत आहे, असा दावाही तेजप्रताप यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि लोजपा नेते चिराग पासवान यांच्यावर बोलताना जीतनराम मांझी यांनी हे त्यांचं हनीमून पॉलिटिक्स असल्याची टीका केली होती. त्यावर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना विचारलं त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं होतं. पण तेजप्रताप यादव यांनी थेट पलटवार केला आहे. मांझी यांच्या मुलाचं एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत लफडं होतं, असा दावाही त्यांनी केला आहे.

… तर लालूंची मुलं रस्त्यावर येतील

तेजप्रताप यादव यांच्या या टीकेला हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनीही पलटवार केला आहे. कोणत्या गोष्टींमुळे तेजप्रताप यादव यांनी त्यांची पत्नी ऐश्वर्या यांना घराच्या बाहेर काढले ते सांगावं. दिल्लीतील फार्महाऊसवरील पार्टीत कोणत्या कारणाने तेजप्रताप यांनी तेजस्वी यांना मारहाण केली होती? असा सवाल दानिश यांनी केला आहे. आम्ही जर पोलखोल करायला सुरुवात केली तर लालूंचे चारित्र्य संपन्न चिरंजीव रस्त्यावर येतील, असा इशाराही त्यांनी दिला. (RJD Attacks Jitan Ram Manjhi On Honeymoon politics Statement)

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये कोण कुणाला फोडणार?, भाजप-जेडीयूला की दोन्ही मिळून काँग्रेसला?; की दोन्ही फुटणार?

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?

नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार, सोमवारी शपथविधी

(RJD Attacks Jitan Ram Manjhi On Honeymoon politics Statement)

Published On - 3:44 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI