AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan : मोदी सरकार Action मोडमध्ये, पण भारतातला हा मोठा नेता पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या विरोधात

India vs Pakistan : नरेंद्र मोदी सरकार फुल Action मोडमध्ये आहे. सरकारकडून एकापोठापाठ एक हाय-लेव्हल बैठका सुरु आहेत. कधी, कुठला मोठा निर्णय जाहीर होईल, याचा नेम नाही. भारतात सुरु असलेल्या घडामोडींमुळे पाकिस्तान पार बिथरुन गेला आहे. अशावेळी भारतातला एक मोठा नेता पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या विरोधात आहे.

India vs Pakistan : मोदी सरकार Action मोडमध्ये, पण भारतातला हा मोठा नेता पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या विरोधात
Indian Politicians
| Updated on: Apr 30, 2025 | 4:06 PM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाच वातावरण आहे. दहशतवाद्यांनी 26 निरपराध पर्यटकांची हत्या केली. दहशतवादी, त्यांचे हँडलर्स आणि पाकिस्तान विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पीएम मोदींपासून अमित शाहंपर्यंत सर्वांनी दहशतवाद्यांना मातीत मिळवण्याचा संकल्प बोलून दाखवलाय. मोदी सरकार पूर्णपणे Action मध्ये आहे. लागोपाठ बैठकांच सत्र सुरु आहे. पाकिस्तान विरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्याची तयारी सुरु आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्व पक्षांनी एक सूरात निषेध केला आहे. मोदी सरकारच बिनशर्त समर्थन करण्याची घोषणा केली आहे. एकाबाजूला सरकार कारवाईची तयारी करत आहे. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला देशांतर्गत राजकारणही जोरात सुरु आहे. विविध राजकीय पक्ष आम्ही सरकारसोबत आहोत, असं सांगत असले, तरी प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे.

काँग्रेसची भूमिका काय?

राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिनशर्त मोदी सरकारच्या समर्थनाची घोषणा केली आहे. दहशतवाद आणि पाकिस्तान विरुद्ध प्रत्येक निर्णयात मोदी सरकारसोबत आहोत, असं काँग्रेसने जाहीर केलय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या संकटकाळात केंद्र सराकरला संपूर्ण समर्थन देण्याची घोषणा केली आहे. एकजुटतेचा संदेश दिला आहे. राहुल गांधी यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केलाय. मोदी सरकारसोबत असल्याच त्यांनी जाहीर केलय.

‘पीओकेकड पहाल, तर चीन आहे’

पहलगाम दहशतवाती हल्ल्यानंतर समाजवादी पार्टीने सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारसोबत उभं राहण्याची घोषणा केली होती. पाकिस्तान आणि दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतल्यानंतर अखिलेश यादव यांची भूमिका बदलल्याच दिसत आहे. पहलगाम हल्ल्यावर काय प्रत्युत्तराची कारवाई करावी, यावर अखिलेश यादव म्हणाले की, “आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. मोकळ्या मनाने बोलायला तयार आहोत. आता देशाच्या सीमेवर सैन्याची गरज आहे. जेव्हा पाकिस्तानचा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा तुम्हाला चीनचाही सामना करावा लागेल. पीओकेकड पहाल, तर तुम्हाला चीनचाही सामना करावा लागेल” जलबंदीनंतर पाकिस्तान संपेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘अशी वक्तव्य लज्जास्पद’

अखिलेश यादव कुठे ना कुठे पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या विरोधात दिसत आहेत. यूपीचे सीएम योगी म्हणाले की, “सपाची भाषा पाकिस्तान सारखी वाटत आहे. कळत नाही ही वक्तव्य सपा नेत्यांची आहेत की, पाकिस्तानची. या लोकांनी तुष्टिकरणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राजकारण करण्याची पण एक सीमा असते. अशी वक्तव्य लज्जास्पद आहेत” पाकिस्तानवर हल्ला सपाला का नकोय? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.