AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना संजय राऊत भेटले; या 5 मुद्यांवर चर्चा झाल्याची शक्यता!

सचिन वाझे प्रकरणाने महाराष्ट्र सरकारची कोंडी सुरू झालेली असतानाच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. (sanjay raut met sharad pawar, discussing on sachin vaze issue)

शरद पवारांना संजय राऊत भेटले; या 5 मुद्यांवर चर्चा झाल्याची शक्यता!
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: Mar 16, 2021 | 5:52 PM
Share

नवी दिल्ली: सचिन वाझे प्रकरणाने महाराष्ट्र सरकारची कोंडी सुरू झालेली असतानाच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीची बैठक झाली. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत आले आहेत. तर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुद्धा पवारांची भेट घेऊन तब्बल अर्धा तास चर्चा केली. या भेटीत एकूण पाच मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे पाच मुद्दे कोणते असू शकतात, त्याविषयीचा घेतलेला हा आढावा. (sanjay raut met sharad pawar, discussing on sachin vaze issue)

गृहमंत्री बदलण्यावर चर्चा

पूजा चव्हाण प्रकरणापासून ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यात अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. आता वाझेंना अटक झाल्याने विरोधकांनी थेट देशमुखांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे राऊत आणि पवार यांच्या भेटीत गृहमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृहमंत्री बदलल्यास विरोधकांकडून होणारी टीका थोपवता येईल आणि वाझे प्रकरणावरून सुरू असलेलं रणकंदनही थांबेल या हेतूने राऊत-पवार यांच्या चर्चा झाल्याचं समजतं. यावेळी अजित पवार किंवा जयंत पाटील यांच्याकडे गृहखाते देण्याबाबतही चर्चा झाल्याचं समजतं.

पोलीस आयुक्तांची बदली

यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांची बदली करण्यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. या बैठकीत परम बीर सिंह यांच्या जागी रजनीश सेठ यांना पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यावरही चर्चा झाल्याचं समजतं. मात्र, पोलीस आयुक्त बदलल्यास पोलीस दलाचं मनोबल खच्ची होईल का? राजकीय नेत्यांना वाचवून अधिकाऱ्यांचा बळी दिल्याचा मेसेज तर जाणार नाही ना? याचीही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.

क्राईम ब्रँचमध्ये साफसफाईवर चर्चा

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचमध्येही साफसफाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. गुन्हे अन्वेषण विभागामध्ये अनुभवी आणि स्वच्छ अधिकाऱ्याला या खात्यात आणण्यावरही चर्चा झाली असून काही नावांवरही चर्चा झाल्याचं समजतं.

राष्ट्रपती राजवटीवर चर्चा

विरोधकांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार नारायण राणे आणि खासदार नवनीत राणा यांनी गृहमंत्र्यांना तसे पत्रंही दिलं आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? त्याची कितपत शक्यता आहे आणि पुढची रणनीती काय असावी? याबाबतही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.

हिरेन प्रकरणही एनआयएकडे गेल्यास?

अँटालिया प्रकरण एनआएकडे असून या प्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, मनसुख हिरेन हे सुद्धा अँटालिया प्रकरणाशी संबंधित होते. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयए करू शकतात. या संभाव्य शक्यतेच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sanjay raut met sharad pawar, discussing on sachin vaze issue)

संबंधित बातम्या:

त्या PPE किटमध्ये सचिन वाझे? NIA चा संपूर्ण तपास ह्या 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती फिरतोय, कसा लागणार छडा? वाचा सविस्तर

…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार, निलेश राणे यांचा इशारा

‘ देवेंद्र फडणवीसांना वेगळा न्याय का; CDR ची माहिती तपास यंत्रणांना द्यावी’

(sanjay raut met sharad pawar, discussing on sachin vaze issue)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.