मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट यावर भाष्य केलं. शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासांची मुदत दिली होती 12 तास अजून शिल्लक आहेत, असही राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांना इतकं गांभीर्यानं का घेता, असं राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना इतक गांभीर्यानं का घेताय? त्यांची विधानं नैराश्यातून येतात, असं संजय राऊत म्हणाले.