AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपण हुशार, विद्वान असलो तरी महापुरुषांवर लिहिताना भान असावं, संजय राऊतांचं वक्तव्य, कुबेरांवरील शाईफेकीचाही निषेध

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात ज्या प्रकारचं कृत्य झालं त्याचा आम्ही निषेध केलेला आहे, असं म्हटलं.

आपण हुशार, विद्वान असलो तरी महापुरुषांवर लिहिताना भान असावं, संजय राऊतांचं वक्तव्य, कुबेरांवरील शाईफेकीचाही निषेध
sanjay raut
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 10:01 AM
Share

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात ज्या प्रकारचं कृत्य झालं त्याचा आम्ही निषेध केलेला आहे, असं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष महाराष्ट्रानं देशाला दिलेले आहेत. त्यांच्या विषयी लेखन करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. कारण कोट्यवधी लोकांच्या भावना युगपुरुषांशी जोडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्यावर काही लिखाण केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरु, मोरारजी देसाई यांना माफी मागावी लागली. जेम्स लेनच्या लेखनावरुन राज्यात आणि देशात वादळ उठलं होतं. आपण कितीही हुशार असलो, विद्वान असलो तरी भान असलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असंही ते म्हणाले.

राष्ट्रपतींची रायगड भेट अभिमानास्पद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं हे आमच्यासाठी अभिमानाचं आहे. संभाजी छत्रपती यांनी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल अभिनंदन करतो, असं संजय राऊत म्हणाले.

सरकारी यंत्रणा मागं लावून छळ

नागालँडच्या प्रकरणावर सरकारनं माफी मागितली आहे. कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात. आमच्या सारख्यांच्या मागे सरकारी यंत्रणांना लावत छळ केला जातो. गोळ्या घातल्या जात नाहीत इतकंच, असं संजय राऊत म्हणाले.

मागच्या अधिवेशनातील शिक्षा पुढच्या अधिवेशनात कशी

राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन हे बेकायदेशीर आहे. तीन महिन्यानंतर पुढच्या अधिवेशनात शिक्षा देणं हे कोणत्या नियमात बसतं, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

भाजपला सावरकरांचं शौर्य दिसत नाही का?

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक सावरकरांबद्दल प्रेम आणि सद्भाव ठेवतो. शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये सावरकरांवर केलेलं पहिलं भाषण नाही. त्यांनी बारामतीतही विद्वतापूर्ण भाषण केलं होतं. भाजपला सावरकरांचा शौर्य का दिसत नाही. त्यांना ते भारतरत्न का देत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

इतर बातम्या:

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल चैत्यभूमीवर, अजित पवार, आदित्य ठाकरेंचीही हजेरी, दादा म्हणतात

दीडशे वर्षांच्या इतिहासात नाशिकचा उज्ज्वल भविष्यकाळ; पण काळासोबत बदलावे लागेल, मान्यवरांचे आवाहन

Sanjay Raut Said Shivsena Condemn the attack on Girish Kuber but the there is need to take care while writing on Great Personalities

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.