AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: भाजपने नवे ‘शिवव्याख्याते’ निर्माण केले, संजय राऊतांचा खोचक टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींसह भाजपवर खोचक टीका केली आहे. भाजपने आता नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत.

VIDEO: भाजपने नवे 'शिवव्याख्याते' निर्माण केले, संजय राऊतांचा खोचक टोला
भाजपने नवे 'शिवव्याख्याते' निर्माण केले, संजय राऊतांचा खोचक टोला
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 12:43 PM
Share

नवी दिल्ली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींसह भाजपवर खोचक टीका केली आहे. भाजपने आता नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत, असा टोला लगावतानाच त्या संदर्भात आता भाजपनेच भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलं आहे. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं वादग्रस्त विधान राज्यपालांनी केलं होतं. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, राज्यपालांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule), भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत. त्या संदर्भात भाजपनेच आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा प्रकारचं विधान इतर कुणी केलं असतं तर भाजपने एव्हाना रस्त्यावर उतरून गोंधळ घातला असता. आम्हीच कसे महाराजांचे विचारक आणि वारसदार आहोत हे दाखवलं असतं. पण आता त्यांच्याच राज्यपालांनी हे विधान केल्याने महाराष्ट्रात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर भाजपने ताबडतोब भूमिका घेणं महत्त्वाचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांचं ट्विट काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हटाव मोहीम; नाशिकमधून थेट राष्ट्रपतींना साकडे!

राज्यपालांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्वरित विधान मागे घ्या; उदयनराजे भोसले यांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण?, सुप्रिया सुळेंकडून पवारांचा व्हिडीओ ट्विट; राज्यपालांना दिले उत्तर

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.