AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Party and Symbol Hearing : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे 6 महत्त्वाचे सवाल; न्यायमूर्तींनी नेमकं काय विचारलं?

शिवसेना पक्षचिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटानंतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद मांडला जात आहे. यावेळी न्यायमूर्ती बागची यांनी पक्षचिन्हाचा अधिकार कोणाला, बहुमत कसे ठरवायचे आणि घटनात्मक पापाचे परिणाम यांसारखे महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले .

Shivsena Party and Symbol Hearing : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे 6 महत्त्वाचे सवाल; न्यायमूर्तींनी नेमकं काय विचारलं?
| Updated on: Oct 06, 2026 | 3:32 PM
Share

Shivsena symbol case : अख्ख्या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या वादावर अद्याप तोडगा निघालेला नसून आता पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाची बाजू मांडून झाली असून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाची बाजू मांडण्यात येत आहे. ठाकरे गटानंतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. ज्येष्ठ वकील एन.के. कौल हे शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. याचदरम्यान न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहे. न्यायमूर्ती बागची यांच्याकडे काही महत्वाचे मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले आहेत.

न्यायमूर्तींनी कोणकोणते प्रश्न उपस्थित केले ?

1) अपात्र सदस्य पक्षातून बाहेर गेले तर उर्वरीत सदस्यांना वेगळे चिन्ह मिळतं. अशा परिस्थितीत पक्ष चिन्हाचा अधिकार कुणाला मिळायला हवा ? असा सवाल न्यायमूर्ती बागची यांच्याकडून विचारण्यात आला.

2) ज्यांनी घटनात्मक पाप केले त्यांच्यासाठी पक्ष चिन्हाचं महत्त्व लागू होईल की ज्यांनी त्या घटनात्मक पापविरोधात तक्रारी केली त्यांच्यासाठी ? असा सवालसुद्धा कोर्टाकडून न्या. बागची यांनी केला.

3) अत्यंत जाणकार निवडणूक आयोगालाही पक्षात नेमके बहुमत कुणाकडे आहे हे ठरवणं कठीण आहे, असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं आहे.

4) तळागाळातील कार्यकर्त्यांची संख्या मोजून लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे जवळपास अशक्य आहे. मग बहुमत कसं ठरवणार ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला.

5) संघटनात्मक चाचणी घेताना एखाद्या पक्षाची अंतर्गत रचना मुळातच अलोकशाही स्वरुपाची असेल, तर त्या पक्षाच्या घटनेनुसार पदांवर असलेल्या व्यक्ती कायदेशीर असू शकतात. पण त्या रचनेतून पक्षाला प्रत्यक्ष तळागाळात किती जनसमर्थन आहे, हे स्पष्टपणे दिसते का ? असा सवालही विचारण्यात आलाय

6) विधानमंडळातील पक्ष हा त्यावेळी निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीत चांगला निकष होता. मात्र आता अपात्रतेचा प्रश्न समोर येत आहे – असं न्यायमूर्ती बागचींनी महत्वाचे मुद्दे उपस्थित करताना म्हटलं आहे.

सुनावणीदरम्यान आता निकाल नेमका कोणाच्या बाजून लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात