AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ते अपघाताच्या वाढत्या संख्येने सुप्रीम कोर्ट चिंतीत, सरकारला दिले कठोर आदेश

रस्त्यावरील वाढत्या वाहन अपघातील मृत्यूंची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. अपघात होऊ नयेत आणि झाले तर तातडीची मदत मिळावी यासाठी कोर्टाने केंद्र सरकारला कठोर उपाय योजना करण्यास सांगितल्या आहेत.

रस्ते अपघाताच्या वाढत्या संख्येने सुप्रीम कोर्ट चिंतीत, सरकारला दिले कठोर आदेश
Supreme Court
| Updated on: Apr 18, 2026 | 10:12 PM
Share

देशातील वाढत्या रस्ते अपघातांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील हलगर्जी कोणत्याही स्थितीत सहन केली जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाने हे देखील नमूद केले आहे की मार्गावर सुरक्षित प्रवास करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि हे सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये राजस्थान आणि तेलंगणात झालेल्या २ भीषण रस्त दुर्घटनात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांनंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेऊन संपूर्ण देशाला महत्वाचे आदेश जारी केले आहेत.

नॅशनल हायवेवर कुठेही कार उभी करण्यास मनाई

राष्ट्रीय महामार्गांवर आता कुठेही कार उभी करण्यास आता कोर्टाने मनाई केली आहे. वाहने केले निश्चित केलेल्या पार्किंग स्थानांवरच थांबवता येतील. नियम तोडणाऱ्यांवर कॅमेरा आणि जीपीएस ट्रॅकींगद्वारे दंडात्मक कारवाई केली जावी. तसेच हायवेच्या किनाऱ्यावर अवैध ढाबे, दुकानांवर आणि अन्य अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. अशा नवीन बांधकामांवरही तातडीने बंदी घालण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने प्रत्येक जिल्ह्यात हायवे सेफ्टी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यात प्रशासन, पोलीस आणि NHAIचे अधिकारी सामील असतील. ही टीम आता नियमित रुपाने हायवेवर टेहळणी आणि तपासणी करणार आहे.

दर ७५ किमीवर एम्ब्युलन्स आणि क्रेन तैनातीचे आदेश

रस्ते अपघातात तातडीने मदत पोहचण्यासाठी कोर्टाने दर ७५ किमीवर एम्ब्युलन्स आणि क्रेन तैनात करण्याचेही निर्देश दिले आहेत. याशिवाय ज्या जागांवर वारंवार अपघात ( ब्लॅक स्पॉट ) होतात. त्यांचा शोध घेऊन चांगले लाईट्स, कॅमेरे आणि सावधानतेचे सुचना फलक लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली की देशातील एकून रस्ते नेटवर्कमध्ये राष्ट्रीय महामार्ग केवळ २ टक्के आहेत. मात्र, येथे सुमारे ३० टक्के रस्ते असे आहेत जेथे अपघात होतात, ही स्थिती गंभीर आहे. कोर्टाने सर्व संबंधित यंत्रणांना ७५ दिवसात याचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.

Follow Us
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व.
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे.
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ.
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.