शरद पवारांची तिसऱ्या आघाडीची खेळी; विरोधी पक्षातच काँग्रेस एकटी पडणार?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो. (Sharad Pawar trying to unit opposition against bjp)

शरद पवारांची तिसऱ्या आघाडीची खेळी; विरोधी पक्षातच काँग्रेस एकटी पडणार?
sharad pawar-sonia gandhi
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 2:04 PM

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे कालच संकेत दिले आहे. पवारांनी अल्टरनेटीव्ह प्रोग्रेसिव्ह मंच निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातच काँग्रेस एककी पडणार की काय? असा सवाल केला जात आहे. (Sharad Pawar trying to unit opposition against bjp)

शरद पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं म्हटलं आहे. तिसऱ्या आघाडीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनीही तिसरी आघाडी बनविण्यावर जोर दिला आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जींनीही तिसरी आघाडी निर्माण करण्यावर जोर दिला आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीला आकार दिला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पवार काय म्हणाले?

पश्चिम बंगाल सारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्वाकडून हल्लाबोल सुरू आहे. त्यामुळे अशावेळी लोकशाहीवादी पक्षांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला पाहिजे. येचुरी यांचा फोन आला होता. अल्टरनेटीव्ह मंच निर्माण करण्याची गरज आहे. त्याबाबत विचार करा. आपण किमान समान कार्यक्रम तयार करू. त्यात काहीच अंतर्विरोध नाही, असं येचुरी यांनी म्हटल्याचं पवारांनी सांगितलं होतं. अनेक नेत्यांनी पर्यायी आघाडी निर्माण करण्याचा आग्रह धरला आहे. त्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे, असं पवारांनी काल म्हटलं होतं.

पाच राज्यांच्या निकालावर लक्ष

दरम्यान, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येण्यास अनेक प्रादेशिक पक्ष तयार नाहीत. आता हे प्रादेशिक पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, त्यावर या आघाडीचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे.

म्हणून दीदींसाठी प्रचार करण्याची तयारी

मोदींना रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. या नेत्यांनी केवळ ममतादीदींना पाठिंबा दिला नाही तर त्यांनी ममतादीदींसाठी प्रचार करण्याची तयारीही दर्शवली आहे. पवारांच्या प्रयत्नामुळेच विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी यांच्या पाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला असून निवडणूक प्रचारासाठी व्यापक रणनीती तयार केल्याचं बोललं जात आहे. टीएमसीनेही मोदींविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची हाक दिली होती. राष्ट्रीय स्तरावर भाजप विरोधात आघाडी निर्माण व्हावी असं टीएमसीने म्हटलं होतं. त्यासाठी अजेंडा आणि कार्ययोजना तयार करण्यावरही टीएमसीने भर दिला होता. त्यानंतर पवारांनी ममता बॅनर्जींसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतरच आरजेडी, सपा, जेएमएम, शिवसेना आणि एनसीपीने ममता बॅनर्जींना पाठिंबा दिल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

आघाडी हवी, पण काँग्रेस नकोच

2014 पासूनच विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. गैर भाजपा आणि गैर काँग्रेसी पक्षांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न होता. अनेक प्रादेशिक पक्षांना नव्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे नकोय. कारण अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांचा थेट काँग्रेसशी सामना आहे. त्यामुळे नव्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसेत्तर पक्षाकडं असावं असं या पक्षांचं म्हणणं आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये लढत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा आमनेसामने आहेत. त्यामुळे काँग्रेसला वगळून नवी आघाडी बनवावी असंही या पक्षांमध्ये घटत असून असं काही झाल्यास विरोधी पक्षातच काँग्रेस एकटी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Sharad Pawar trying to unit opposition against bjp)

पवारांकडे नेतृत्व आले तर…

पवारांचे अनेक राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. टीआरएस, बीजेडी, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांसोबत पवारांचे चांगले संबंध आहेत. मात्र, असं असलं तरी हे पक्ष काँग्रेससोबत यायला तयार नाहीत. त्यामुळे या पक्षांनी भाजपशी चांगले संबंध ठेवले आहेत. उद्या आघाडीचं नेतृत्व पवारांकडे आल्यास हे पक्ष पवारांसोबत येऊ शकतात. तर जेएमएम, आरजेडी, सपा आणि डावे पक्षही पवारांसोबत उभे राहू शकतात. त्यामुळे काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसू शकतो. अशात काँग्रेस विरोधी पक्षातच एकाकी पडू शकते, असंही राजकीय विश्लेषकांचं निरीक्षण आहे. (Sharad Pawar trying to unit opposition against bjp)

संबंधित बातम्या:

तुम्ही गृहमंत्री होणार का?; जयंत पाटील म्हणतात, या बाजारातल्या गप्पा!

‘2 मुलींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप’, न्याय न मिळाल्याने पीडित आई थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक रिंगणात

TMC नेते अभिषेक बॅनर्जींच्या रॅली नंतर भाजपच्या सन्मान यात्रेच्या रथावर हल्ला!

(Sharad Pawar trying to unit opposition against bjp)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.