बुंदी सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासा, हत्येनंतरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बुंदी सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासा, हत्येनंतरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

मुलगी बराच वेळ घरी परतली नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध सुरु केला. तेव्हा गावातील एका महिलेने जंगलातून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला होता, असे सांगितले. त्यानंतर मुलीचे वडील तिला शोधण्यासाठी गेले असता तेथे पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 04, 2022 | 4:35 PM

राजस्थान : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आता आणखी धक्कादायक खुलासा झाला आहे. नराधमांनी मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्यावर बलात्कार सुरुच ठेवला होता, असे शव विच्छेदन अहवालात उघड झाले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत पीडिता या नराधमांचा विरोध करीत राहिली. मात्र आरोपींनी तिचा गळा दाबून तिची हत्या केली.

शव विच्छेदन अहवालामुसार मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 30 हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तिची हत्या केल्यानंतरही नराधमांनी सोडले नाही. पीडितेच्या ओढणीनेच तिचा गळा आणि हात बांधले होते, त्यानंतर आरोपी तिच्यावर बलात्कार करत होते. बुंदी पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या आयुष्यात अशी क्रूरता कधीच पाहिली नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नुकतेच बुंदी येथे 16 वर्षीय आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना बुंदी जिल्ह्यातील बसोली पोलीस स्टेशन हद्दीतील काला कुआन गावात घडली होती. काला कुआम गावात तीन नराधमांनी 16 वर्षीय मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिला जंगलात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर गळा दाबून तिची हत्या केली. तसेच दगडाने तिचा चेहरा ठेचला. यानंतर नराधमांची क्रूरता थांबली नाही. हत्या केल्यानंतरही तिच्या मृतदेहावर बलात्कार करीत राहिले.

घरच्यांनी शोध घेतला असता जंगलात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह

मुलगी बराच वेळ घरी परतली नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध सुरु केला. तेव्हा गावातील एका महिलेने जंगलातून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला होता, असे सांगितले. त्यानंतर मुलीचे वडील तिला शोधण्यासाठी गेले असता तेथे पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. आरोपींच्या चौकशीत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हृदय पिळवटून टाकणारी क्रूरता समोर आली आहे. (Shocking revelation in Rajasthan Bundi gang rape case, Rape of a minor girl even after murder)

इतर बातम्या

मुंबई पोलिसांकडून शिका, दिल्ली पोलिसांना ट्विटरवर सल्ला, #MumbaiPolice ट्रेडिंग, बुल्लीबाई केसचं काय आहे कनेक्शन?

विवाहित प्रेयसीसोबत नगरहून कोल्हापूर गाठलं, धर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें