AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारगिल युद्ध : पाकिस्तानच्या तावडीतून आठव्या दिवशी परतलेला जवान

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. मंगळवारी भारतीय वायूसेनेने पुलवामा हल्ल्याचं उत्तर देत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकून तब्बल 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने […]

कारगिल युद्ध : पाकिस्तानच्या तावडीतून आठव्या दिवशी परतलेला जवान
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. मंगळवारी भारतीय वायूसेनेने पुलवामा हल्ल्याचं उत्तर देत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकून तब्बल 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. त्यानंतर पाकिस्तानकडून काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

पाकने भारताच्या एका विंग कमांडरला अटक केल्याचा दावा केला आहे, याबाबतचा एक व्हिडीओही पाककडून जारी करण्यात आला. पाकचा दावा किती खरा आहे, याबाबत सध्या तपास सुरु आहे. मात्र, 20 वर्षांआधी कारगिल युद्धावेळी पाकिस्तानने अशाच प्रकारे भारताच्या एका फायटर पायलटला अटक केली होती. के. नचिकेत असे त्या पायलटचे नाव होते. ते पाकच्या हाती लागले आणि तिथून सुरक्षितपणे परतलेही.

3 जून 1999 साली कारगिल युद्धादरम्यान एआयएफ फायटरचे पायलट नचिकेत यांच्याकडे भारतीय वायूसेनेच्या ‘ऑपरेशन सफेद’मध्ये MIG 27 उडवण्याची जबाबदारी होती. त्यांनी आपली जबाबदारी मोठ्या शिताफीने पूर्ण करत पाकिस्तानच्या अगदी जवळ जात 17 हजार फुटाच्या अंतरावरुन रॉकेट हल्ला केला. तसेच त्यांनी शत्रूच्या छावणीवर लाईव्ह रॉकेट फायरिंग करत शत्रूला सळो की पळो करुन सोडलं. याचवेळी दुर्दैवाने नचिकेता यांच्या विमानाचं इंजिन खराब झालं. यामुळे इंजिनमध्ये आग लागली आणि विमान कोसळलं.

विमान कोसळल्यानंतर नचिकेत त्या विमानातून सुखरुप बाहेर पडले. मात्र, ते पाकिस्तान अधिकृत काश्मीरच्या स्कार्दू येथे अडकले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कर त्यांना ताब्यात घेण्यात यशस्वी ठरलं. ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. त्यांच्याकडून भारतीय लष्कराची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. या शूर जवानाने ते सर्व अत्याचार सहन केले, मात्र भारताच्या लष्कराची कुठलीही माहिती शत्रूंना दिली नाही.

नचिकेत यांच्यावर शत्रूने अनेक अत्याचार केले. त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी त्यांचा मानसिक छळही करण्यात आला. मात्र, हा भारत मातेचा सुपूत्र शत्रूंसमोर नमला नाही. त्यांनी शत्रूंचे सर्व अत्याचार सहन केले, पण देशाशी गद्दारी केली नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता तो शत्रूचे अत्याचार सहन करत होता. तब्बल आठ दिवस तो शत्रूच्या ताब्यात होता. जिथे एक क्षणही काढणे शक्य नाही त्या पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात त्यांनी आठ दिवस काढले.

नचिकेत यांना पाकिस्तानने अटक केल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मीडियाने उचलून धरला. त्यामुळे पाकिस्तानवरील दबाव वाढत चालला होता. दुसरीकडे, भारत सरकार नचिकेत यांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस प्रयत्न करत होती. अखेर भारताच्या प्रयत्ननांना यश आले आणि तब्बल आठ दिवसांनी पाकिस्तानला नचिकेत यांची सुटका करावी लागली. पाकिस्तानी लष्कराने नचिकेत यांना इंटरनॅशनल कमेटी ऑफ द रेड क्रॉसकडे सोपवलं. त्यानंतर नचिकेत यांना वाघा बॉर्डरमार्गे भारतात आणण्यात आले.

माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नचिकेत यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर कारगिलचे हे युद्ध 26 जुलै 1999 रोजी संपले. नचिकेत यांच्या शौर्याचा सन्मान करत भारतीय वायूसेनेने त्यांना लष्कराच्या पदकाने सन्मानित केले होते.

एका पायलटचं हृदय हे नेहमी विमानाशी जोडलेलं असतं, असं नचिकेत म्हणायचे.

फायटर पायलट के. नचिकेत कोण आहेत ?

के. नचिकेत यांचा जम्न 31 मे 1973 साली झाला. आर. के शास्त्री आणि श्रीमती लक्ष्मी शास्त्री असे त्यांच्या आई-वडिलांचे नाव. त्यांनी दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयातून शालेय शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी पुण्याच्या खडकवासला नॅशनल डिफेंस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. 1990 साली ते वायुसेनेत रुजू झाले. त्यांनी 1990 ते 2017 सालापर्यंत भारतीय वायुसेनेत भारताला सेवा दिली. भारतीय वायुसेनेत ते ग्रुप कॅप्टन होते. कारगिल युद्धात जखमी झाल्यामुळे ते फायटर विमान उडवण्यात सक्षम नव्हते. मात्र, तरीही त्यांनी हिम्मत हारली नाही. कारगिल युद्धानंतर त्यांनी विशाल Il-76 ट्रासपोर्ट विमान उडवलं.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.