AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या रुममध्ये ये, परदेशात नेईन, पैसेही लागणार नाहीत…’ स्वामी चैतन्यानंदच्या व्हॉट्सअप चॅटने खळबळ

दिल्लीच्या नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील कथित बाबा चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी याच्यावर विद्यार्थीनींशी अश्लील चॅटींग करणे, त्यांना रात्री अपरात्री बोलावणे आणि न आल्यास नापास करण्याची धमकी देणे असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

'माझ्या रुममध्ये ये, परदेशात नेईन, पैसेही लागणार नाहीत...' स्वामी चैतन्यानंदच्या व्हॉट्सअप चॅटने खळबळ
Swami Chaitanya Anand
| Updated on: Sep 24, 2025 | 3:26 PM
Share

व्हॉट्सअपवर अश्लिल मॅसेज, रात्रीचे उशीरा बोलावणे, नापास करण्याची धमकी…दिल्लीतील श्री शारदा इन्स्टीट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमधील हा प्रकार धक्कादायक आहे. विद्यार्थींनीशी गैरवर्तणूक करणारा हा कथित संत स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी बाबा पोलिसांपासून वाचण्यासाठी आता प्रयत्न करत असून आता फरार झाला आहे. परदेशात नेण्याचे लालूच दाखवण्यापासून ते परीक्षेत मार्क कापण्यापर्यंतचा बाबाचा हा खेळ पीडित मुलींच्या चॅट्स आणि जबानीतून उघड झाला आहे.

अश्लील मॅसेज आणि धमक्या

दिल्ली पोलीसांकडे दाखळ एफआयआरप्रमाणे स्वामी चैतन्यानंद विद्यार्थीनींना रात्री उशीरा विद्यार्थीनींना व्हॉट्सअप मॅसेज पाठवायचा. त्यातील भाषा इतकी अश्लील होती वाचताना मुलींना भीती वाटायची. काही मॅसेजमध्ये माझ्या रुमवर या तुम्हाला परदेशी फिरायला नेईन, तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत. माझे ऐकले नाही तर तुम्हाला नापास करीन अशा धमक्या आहेत. पीडीत मुलींनी सांगितले की जर विरोध केला तर त्यांचे मार्क कापण्याची आणि करियर बर्बाद करण्याची धमकी मिळायची.

वॉर्डन देखील सामील

या कहानी यात बाबाला इन्स्टीट्यूटच्या तीन महिला वॉर्डन देखील मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिस तपासात असे उघड झाले आहे की महिला वॉर्डन मुलींना शांत बसण्याचे आणि त्यांच्या मोबाईलमधील चॅट डीलीट करायच्या. वॉर्डन आपल्या हॉस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी द्यायच्या. त्यामुळे आम्ही नाईलाजाने शांत बसायचो. दिल्ली पोलीसांनी आता तिन्ही महिला वॉर्डनचे जबाब नोंदवला असून त्यांच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर केस उघड

४ ऑगस्ट २०२५ रोजी श्री शृंगेरी मठाच्या वतीने प्रशासक पी.ए. मुरली यांनी दिल्ली पोलिसांना तक्रार दिली. तक्रारीत स्पष्ट लिहिले होते की चैतन्यानंदने आर्थिक रुपाने कमजोर विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केले असून त्यांची फसवणूक केली आहे.पोलिसांनी जसा तपास सुरु केला तसतसे सत्य बाहेर येऊ लागले.

तपासादरम्यान पोलिसांनी इस्टिट्यूटच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्याचा प्रयत्न केला तर रेकॉर्डिंग डिलीट केलेली आढळली. त्यामुळे असा संशय आहे की महिला वॉर्डन आणि बाबाने मिळून पुरावे नष्ट केले असावेत. डीव्हीआरला आता फॉरेन्सिक लॅबोरेटरीत पाठवले आहे. विद्यार्थीनींचे मोबाईल देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.कारण अनेक चॅट्स डीलिट केले आहेत. पोलीसांचे म्हणणे आहे की डीलीट केलेला मजकूर रिकव्हर झाल्यास केस आणि मजबूत होईल.

विदेश कनेक्शन आणि फरारी

एफआयआर दाखल झाल्यानंतर चैतन्यानंद लंडनमध्ये होता. त्याचे शेवटचे लोकेशन आगरा येथे ट्रेस झाले होते. तो परदेशात पळण्याच्या तयारीत होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने LOC (Look Out Circular) जारी केली आहे. बाबाजवळ एक वॉल्वो कार होती,आणि तिला डिप्लोमॅटीक नंबरप्लेट होती. कार कोणा भलत्याच्या नावाने नोंदलेली होती. त्यामुळे बाबाच्या परदेशी नेटवर्कवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

जामीनासाठी अर्ज केला होता

बाबाने दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. परंतू सुनावणी आधीच त्याने याचिका मागे घेतली. तो पोलीस त्याच्या किती मागे लागली आहे याचा अंदाज तो घेत होता. मुलींच्या विनयभंग सोबत मठाची फसवणूक केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. जमीन आणि संपत्तीत त्याने फसवणूक केली आहे. याचाही तपास सुरु आहे. दिल्ली पोलिसांची पथके हरियाणा, यूपी, राजस्थान आणि उत्तराखंड छापेमारी करीत आहे. बाबाला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.