AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu : सर्वात मोठी बातमी! विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी

Tamil Nadu Politics : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे.

Tamil Nadu : सर्वात मोठी बातमी! विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी
CM VijayImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 20, 2026 | 10:46 PM
Share

तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मदुराई येथील केके रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामुळे विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केके रमेश यांनी आरोप केला आहे की, अलीकडील विधानसभा निवडणुकांनंतर TVK ने घोडेबाजार करत इतर आमदारांचा पाठिंबा मिळवला. तसेच रमेश यांनी भाजपविरोधात CBI चौकशीची मागणी केली आहे. याचिकेत भारत सरकार, CBI आणि तमिळनाडू सरकारला पक्षकार करण्यात आले आहे. आता यावर सुनावणी पार पडल्यानंतर कोर्ट काय निर्णय देते ह पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

तमिळनाडूमध्ये TVK हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र, सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत त्यांच्याकडे नव्हते. या विधानसभा निवडणुकीत TVK ने 108 जागा जिंकल्या होत्या. TVK पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर काँग्रेस, CPI, CPM आणि IUML यांनी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर विजय यांनी 10 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध केले.

बहुमत चाचणीत AIADMK च्या 25 आमदारांचा पाठिंबा

विजय यांच्या सरकारच्या बहुमत चाचणीत मोठा वाद निर्माण झाला. विजय यांच्या पक्षाने विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध केले तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण AIADMK चे 25 आमदार TVK च्या समर्थनार्थ उभे राहिले. त्यामुळे TVK आघाडीचा आकडा 144 च्या पुढे गेला. या घोडेबाजाराच्या विरोधात आता याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे.

59 वर्षांनंतर काँग्रेसला तमिळनाडू मंत्रिमंडळात स्थान

तमिळनाडूमध्ये काँग्रेसचे दोन आमदार गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेस आमदार राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन तमिळनाडू सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी होणार आहेत. तब्बल 59 वर्षांनंतर काँग्रेस तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात सहभागी होत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ