Video : फुटबॉलचा सामना सुरू असतानाच प्रेक्षक गॅलरी कोसळली, घटना कॅमेऱ्यात कैद; काही जण गंभीर

मलप्पुरम येथील पुंगोड (Poongod) येथे फुटबॉल (Football) सामन्यादरम्यान उभारण्यात आलेली गॅलरी कोसळली(Collapsed). या दुर्घटनेत जवळपास 200 लोक जखमी झाले असून पाच गंभीर जखमी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Video : फुटबॉलचा सामना सुरू असतानाच प्रेक्षक गॅलरी कोसळली, घटना कॅमेऱ्यात कैद; काही जण गंभीर
मलप्पुरम येथील पुंगोड येथे कोसळली फुटबॉल सामन्यादरम्यान उभारण्यात आलेली गॅलरी.Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 11:42 AM

मलप्पुरम (केरळ) : मलप्पुरम येथील पुंगोड (Poongod) येथे फुटबॉल (Football) सामन्यादरम्यान उभारण्यात आलेली गॅलरी कोसळली (Collapsed). या दुर्घटनेत जवळपास 200 लोक जखमी झाले असून पाच गंभीर जखमी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी सामना सुरू होण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हा सर्व अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येईल, की तात्पुरत्या स्वरुपात उभारलेली गॅलरी व्हिडिओमध्ये दिसत आहे. सामना सुरू होण्यापूर्वीची ही घटना असावी. मैदानात संघ दिसत आहेत. तर प्रेक्षकांची संख्याही जास्त दिसत आहे. गॅलरी पूर्ण भरलेली दिसत आहे. सामन्यादरम्यान अचानक ही गॅलरी कोसळते. त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाल्याचे दिसत आहे.

रात्री नऊच्या दरम्यानची घटना

केरळमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान हा अपघात झाला. मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूरजवळ हा अपघात झाला. फुटबॉल स्टेडियमची तात्पुरती गॅलरी कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये सुमारे 200 जण जखमी झाले. 5 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा गॅलरीत 2 हजारांहून अधिक लोक सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. दोन स्थानिक संघांमधील अंतिम सामना पाहण्यासाठी लोक आले होते.

‘…तरीही ये-जा थांबवली नाही’

गॅलरी पूर्ण भरल्यानंतरही कार्यक्रमानंतर आयोजकांनी पाहुण्यांची ये-जा थांबवली नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आता याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तर पोलीस याप्रकरणी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा :

Goa Government Formation: गोव्याचे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला, अमित शहांच्या घरी बैठक, विश्वजीत राणेंचं काय होणार?

Uttar Pradesh : समाजवादी पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप, वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवलं, अखेर आमदारावर गुन्हा दाखल

Madhya pradesh : दोन समाजात तुफान हाणामारी, घटनेत एकाचा मृत्यू, आरोपींच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.