Video : मध्यप्रदेशातील मल्टी स्पेशलिटी हॉपस्पीटलमध्ये भीषण आग; आगीत दहा जणांचा मृत्यू

या रुग्णालयामध्ये आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे अनेक जण रुग्णालयात अडकल्याचे समजते. अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.

Video : मध्यप्रदेशातील मल्टी स्पेशलिटी हॉपस्पीटलमध्ये भीषण आग; आगीत दहा जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 5:44 PM

जबलपूर :  मध्यप्रदेशातील(Madhya Pradesh) एका खाजगी रुग्णालयाला भीषण आग(Massive fire) लागली आहे. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. येथील शिवनगर परिसरात असलेल्या न्यू लाईफ मल्टी स्पेशलिटी(multi-specialty hospital) या खाजगी रुग्णालयात आगीची ही भीषण दुर्घटना घडली आहे. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या रुग्णालयामध्ये आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे अनेक जण रुग्णालयात अडकल्याचे समजते. अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.

क्षणात आग बेकाबू झाली

न्यू लाईफ मल्टी स्पेशलिटी(multi-specialty hospital) हे मध्य प्रदेशातील एक नामांकित हॉस्पीटल आहे. विविध आजारांवर येथे उपचार केले जातात. यामुळे अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आग लागताच हॉस्पीटलमधील स्टाफने आग विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आणखीणच भडकली. कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत तात्काळ रुग्णालयातील वीज पुरवठा बंद केला. यामुळे मोठी हानी टळली.

आगीत दहा जणांचा मृत्यू

रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या या भीषण दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती उपचारासाठी आलेले रुग्ण होतो की कोण होते. या बााबत अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही. ही दुर्घटना अत्यंत भीषण होती यामुळे यात अनेक जण जखमी झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत हॉस्पीटलचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान(Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या दुर्घटनेनंतर एक ट्वीट करत तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आपण सातत्त्याने रुग्णालय प्रशानाच्या संपर्कात असून जखमींना वेळेवर उपचार मिळावेत तसेच सर्व मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे. मुख्य सचिवांना परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्याचेही चौहान यांनी सांगीतले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.