AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती, पाकिस्तानच्या मित्र राष्ट्राचं नौदल कराचीत दाखल

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारत-पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती, पाकिस्तानच्या मित्र राष्ट्राचं नौदल कराचीत दाखल
| Updated on: May 04, 2025 | 7:49 PM
Share

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे तुर्कीचं नौदल जहाज टीसीजी बुयुकाडा रविवारी कराची बंदरामध्ये दाखल झालं आहे, तुर्की नौदलाचं जहाज सद्भावना म्हणून काराचीमध्ये आल्याचं स्पष्टीकरण यावर पाकिस्तानच्या वतीनं देण्यात आलं आहे. मात्र पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

याबाबत माहिती देताना पाकिस्तानच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आलं की, तुर्कीचं नौदल जहाज टीसीजी बुयुकादा कराची बंदरात पोहोचलं आहे. कराचीमध्ये तुर्कीच्या नौदलाचं जंगी स्वागत करण्यात आलं. तुर्की नौदल आणि पाकिस्तानी नौदलामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये युद्ध प्रशिक्षण, मदत, परस्पर सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत माहिती देताना पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे की, तुर्की नौदलाचं जहान पाकिस्तानमध्ये आलं आहे. हे एक चांगले संबंध, बंधूभाव आणि पक्की मैत्री यांचं एक चांगलं उदाहरण आहे. तुर्की नौदल आणि पाकिस्तानी नौदल यांच्यामध्ये यादरम्यान विविध विषयांवर चर्चा होईल. दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करण्याची ही एक संधी आहे.

पाकिस्तानचा जळफळाट

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. आयात-निर्यात बंद करण्यात आली आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असून, त्यांच्या नेत्यांकडून सातत्यानं युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...