दहशतवादी डॉक्टर उमर नबीकडून बूट बॉम्बचा वापर करुन स्फोट, तपासातून खळबजनक माहिती, थेट रसायन…
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. या स्फोटामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तपास सध्या सुरू असून धक्कादायक अशी माहिती पुढे येतंय.

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. सुरूवातीला हा स्फोट असल्याचे वाटले. मात्र, त्यानंतर धक्कादायक खुलासे होताना दिसले. थेट जैश-ए-मोहम्मदचा बॉम्बस्फोटामागे हात असल्याचे स्पष्ट झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे थेट काही डॉक्टरांनी मिळून हा कट रचला. फक्त कटच नाही तर मागील काही दिवसांपासून याचे नियोजन सुरू होते आणि त्यांचे टार्गेट दिल्लीचा लाल किल्ला नव्हता. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात केलेल्या बॉम्बस्फोटापेक्षाही त्यांचे खतरनाक प्लनिंग होते. लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट घाईमध्ये झाला. स्फोट घडवून आणण्यासाठी यांना 20 लाख रूपये पाठवण्यात आली. यासोबतच स्फोटाचे साहित्य नेपाळ आणि बांगलादेश सीमेवरून भारतात पाठवण्यात आले.
आता दिल्ली लाल किल्ला स्फोटाबद्दल अत्यंत धक्कादायक अशी माहिती पुढे येताना दिसतंय. तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवादी डॉक्टर उमर नबीने शू बॉम्ब म्हणून काम केले. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणेने घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे जप्त केले. त्यानुसार आता स्पष्ट होतंय की, दहशतवादी उमर नबी याने स्फोट घडून आणण्यासाठी आपल्या बुटाचा वापर केला. बॉम्ब सक्रिय करण्याचे त्यांचे अगोदरच सर्व प्लॅनिंग होते.
स्फोटकांनी भरलेली i-20 कारच्या उजव्या पुढच्या टायरजवळ ड्रायव्हरच्या सीटखाली एक बूट सापडला. बूटाच्या आत एक धातूचा पदार्थ आढळून आला. याचा वापर स्फोट घडवण्यासाठी करण्यात आला. टायर आणि बुटांवर संवेदनशील स्फोटक TATP चे निशान आढळून आले. उमरने स्फोट घडवण्यासाठी त्याच्या बुटांचा वापर केला हा पदार्थ टाकल्यावर स्फोट लगेचच होतो. पायातील बुड थोडा घासला तरीही स्फोट होतो. हा अत्यंत घातक पदार्थ आहे, जो उमरने त्याच्या बुटावर टाकला होता.
उमरने दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भर रस्त्यावर हा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. हा हल्ला डॉ. उमर नबी यांनी केला असला तरी, त्यामागे खतरनाक प्लॅनिंग होते. हैराण करणारे म्हणजे डॉक्टर म्हणून उच्चपदावर असलेल्यांनी हा कट रचला. सध्या या प्रकरणातील आरोपी ताब्यात असून त्यांची तपास यंत्रणांकडून कसून चाैकशी केली जात आहे.
