दिल्ली स्फोट प्रकरणातील दहशतवादी डॉ. शाहिनाबद्दल विभक्त पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, दहशतवाद्यांसोबतच्या…
लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अनेक डॉक्टर थेट या कटात सहभागी असल्याचे स्पष्ट होतंय. मात्र, कोणाच्या पतीने घटस्फोट दिला तर कोणाच्या पत्नीने सोडल्याची पार्श्वभूमी या डॉक्टरांची आहे.

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबरच्या सायंकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर देशात खळबळ उडाली. सुरूवातीला हा स्फोट असल्याचे समजले. त्यानंतर एका मागून एक असे खळबळजनक खुलासे होताना दिसली. हेच नाही तर स्पष्ट झाले की, हा साधा स्फोट नव्हता तर मोठा दहशतवादी हल्ला होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून या हल्ल्याचा कट रचला जात होता. i-20 गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. दहशतवादी उमर गाडी चालवत होता. तब्बल 11 तास तो स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन दिल्लीमध्ये फिरत होता. लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये तीन तास गाडी होती. धक्कादायक बाब म्हणजे स्फोट घडून आणण्यात डॉक्टरांची नावे पुढे आली. या प्रकरणात मोठी खुलासे होत आहेत.
डॉ. शाहीन सईद ही फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाशी संलग्न होती. ती थेट जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात होती आणि तिच्या बॅंक खात्यात अनेक विदेशी व्यवहार हैराण करणारी आहेत. तिला मोठ्या प्रमाणात जैश-ए-मोहम्मदकडून पैसा येत होता. महिलांची दहशतवादी संघटना तयार करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. जैश-ए-मोहम्मदच्या फरिदाबाद मॉड्यूलच्या दहशतवादी निधीची चौकशी केली जातंय.
डॉक्टर शाहिना सईदचे एक्स पती हयात जफर यांनी नुकताच शाहिनाचे नाव दहशतवादी संघटनांशी जोडले गेल्यानंतर मोठे भाष्य केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, मला तिच्या दहशतवादी संबंधांबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती अजिबातच नव्हती. आम्ही नऊ वर्ष एकत्र होते हे खरे होते. मात्र, आमच्या घटस्फोटाचे कारण वेगळे होते. शाहिनाच्या एक्स पतीने म्हटले की, आमचे वैवाहिक आयुष चांगले सुरू होते. सर्वकाही व्यवस्थित होते. आम्हाला दोन मुले आहेत.
तिचे दहशतवाद्यांसोबत असलेल्या संबंधांची मला अजिबातच कल्पना नव्हती. तिला विदेशात जायचे होते. तिने त्याकरिता माझ्या मागे तगादा लावला. मी तिला बोललो होतो की, आपण भारतात राहू, कारण इथे सर्व नातेवाईक वगैरे आहेत. विदेशात गेल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. मात्र, ती ऐकण्यास तयार नव्हती. विदेशात जाण्याच्या मुद्द्यावरून आमच्यात घटस्फोट झाला.
