CDS Bipin Rawat : देशातले पहिले सीडीएस बिपीन रावत, वाचा सविस्तर…

सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक आहेत. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे आहे.

CDS Bipin Rawat : देशातले पहिले सीडीएस बिपीन रावत, वाचा सविस्तर...
बिपीन रावत, सीडीएस
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 2:28 PM

मुंबई : बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक आहेत. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे आहे.

शिक्षण आणि सुरुवात

बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. त्यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

विविध पदांवर काम

बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 रोजी यश मिळाले. त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.

पदकं आणि सन्मान सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

‘टीमवर्कमुळे यश’

रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली आहेत. आता त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि आता ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक आहेत. बिपिन रावत म्हणतात, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता त्यांची भारतातील पहिली सीडीएस अधिकारी म्हणूनही नियुक्ती झालीय.

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावतही जखमी?

Nanded: गाडीपुरा भागात रात्री दगडफेक, दोघे गंभीर जखमी, घरांचे नुकसान, 13 अटकेत, नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता

Cobra Video | अजब गावात गजब प्रकार, नागाने जबड्यातून बाहेर काढला मृत घोणस, कोल्हापुरात चर्चा

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.