गोव्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; फातोर्डा स्टेडियमवरचे पत्रे उडाले

मडगाव : गोव्याला (Goa) गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह पाऊसाचा फटका बसला. अचानक झालेल्या वादळी वार्‍यासह पाऊसामुळे (rain) गोव्यातील नागरिकांची झोप उडवली. तसेच जोरदार झालेल्या वादळी वार्‍यामुळे फातोर्डा स्टेडियमवरील छपराचे पत्रे अचानक उडाले. तसेच यापरिसरात असणाऱ्या अनेक घरांची छपर देखील उडून गेली. यामुळे परिसारातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर अनेक घरांचे नुसकान देखील झाले आहे. त्याचबरोबर […]

गोव्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; फातोर्डा स्टेडियमवरचे पत्रे उडाले
फातोर्डा स्टेडियमवरील छपराचे पत्रे उडालेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 3:32 PM

मडगाव : गोव्याला (Goa) गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह पाऊसाचा फटका बसला. अचानक झालेल्या वादळी वार्‍यासह पाऊसामुळे (rain) गोव्यातील नागरिकांची झोप उडवली. तसेच जोरदार झालेल्या वादळी वार्‍यामुळे फातोर्डा स्टेडियमवरील छपराचे पत्रे अचानक उडाले. तसेच यापरिसरात असणाऱ्या अनेक घरांची छपर देखील उडून गेली. यामुळे परिसारातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर अनेक घरांचे नुसकान देखील झाले आहे. त्याचबरोबर फातोर्डा स्टेडियमवरील (Nehru Stadium) छपराचे पत्रे हे परिसरातील इतर घरांवर पडल्याने त्यांचेही नुकसान झाले. यामुळे परिसरातील नागरिकांकडून स्टेडियम छपराबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यातच वादळी वाऱ्याने फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमच्या वेस्ट स्टॅण्ड वरील छप्पर उडून गेले होते. त्यावेळी सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

फातोर्डा स्टेडियमवरील छप्पर उडून गेले

फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमच्या वेस्ट स्टॅण्ड वरील पत्रे उडाल्याची बातमी ताजी असतानाच पुन्हा अशीच घटना समोर आली आहे. गेल्यामहिन्यात वादळी वाऱ्याने फातोर्डा स्टेडियमच्या वेस्ट स्टॅण्ड वरील छप्पर उडून गेले होते. त्यावेळी सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर छप्पराच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र कामपूर्ण होते ना होते तेच काल पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा फातोर्डा स्टेडियमला बसला आणि पत्रे उडून गेले. त्यामुळे स्टेडियमवरील कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

छप्पर सुमारे 30 वर्षांपूर्वीचे

दरम्यान फातोर्डा स्टेडियमचे सध्याचे छप्पर सुमारे 30 वर्षांपूर्वी बनविण्यात आले होते. तसेच त्याचे पत्रे सतत उडून जात असल्याने ते बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे हे काम रखडले होते. मात्र आता गोव्याचा निकाल लागला असून सत्ता ही स्थापन झाली आहे. त्यामुळे याचे काम लवकर सुरू व्हावे अशी नागरिकांच्यासह क्रिकेटप्रेमींची मागणी आहे.

अनेक घरांची छपरही गेली उडून

गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह पाऊसाने गोव्यात हजेरी लावली. तर जोरदार वादळी वार्‍यामुळे फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमच्या वेस्ट स्टॅण्ड वरील पत्रे उडून गेले. तसेच याच परिसरात असणाऱ्या अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेलेत. त्यामुळे या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर भर पावसात पत्रे उडून गेल्याने पावसाचे पाणी घरातच घुसले. यामुळे प्रापंचीक साहित्याचे नुकसान झाले.

इतर बातम्या :

Jalgaon : जळगावमध्ये गडकरींच्या हस्ते अपूर्ण महामार्गाचे लोकार्पण; तरीही 15 किमी अंतरात 2 टोल नाक्यांचा भुर्दंड

Navneet Rana and Ravi Rana : राणा दाम्पत्य उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार, राणा दाम्पत्य ठाम; शिवसेना काय भूमिका घेणार?

Zodiac | साक्षात लक्ष्मीचं रुप असतात या राशीच्या मुली, लग्न केल्यानंतर मुलांचे नशीबच बदलून जाते

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.