स्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं आज निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या आजाराने त्यांचं निधन झालं. मनोहर पर्रिकर एक असं व्यक्तीमत्व होतं ज्यांची साधेपणा हीच ओळख होती. ते चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, चारवेळा मुख्यमंत्री पद भूषवूनही त्यांनी कुठल्याही व्हीआयपी सुविधांचा कधीही उपभोग घेतला नाही. …

Manohar Parrikar, स्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं आज निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या आजाराने त्यांचं निधन झालं. मनोहर पर्रिकर एक असं व्यक्तीमत्व होतं ज्यांची साधेपणा हीच ओळख होती. ते चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, चारवेळा मुख्यमंत्री पद भूषवूनही त्यांनी कुठल्याही व्हीआयपी सुविधांचा कधीही उपभोग घेतला नाही. ते भारताचे पहिले असे मुख्यमंत्री होते ज्यांनी आयआयटीचं शिक्षण घेतलं होतं.

 

Manohar Parrikar, स्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी
2001 मध्ये त्यांच्या पत्नी मेधा यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर पर्रिकरांवर त्यांच्या दोन मुलांची जबाबदारी आली. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून ते त्यांच्या मुलांना सर्व सुख-सुविधा देऊ शकत होते. मात्र, त्यांनी असं केलं नाही. त्यांनी फक्त त्यांच्या पगारातून आपल्या मुलांचा सांभाळ केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या शासकीय घरालाही त्यांनी नम्र नकार दिला. स्वत:च्या घरात ते त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे.

विधानसभेपर्यंत जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या गाड्या आणि इतर सरकारी सुविधाही त्यांनी कधी घेतल्या नाहीत. विधानसभेला जाण्यासाठी पर्रिकर हे त्यांच्या स्कूटरचा वापर करायचे. गोव्यात असो किंवा गोव्याच्या बाहेर त्यांनी कधीही सरकारी सुविधा उपभोगल्या नाहीत. त्यासाठीच ते ओळखले जायचे. गोव्यातून बाहेर ते इतर सामान्य नागरिकांप्रमाणे वावरायचे. कुठेही येण्या-जाण्यासाठी ते रिक्षा किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचे. विमानातून प्रवास करतानाही ते नेहमी इकॉनॉमी क्लासमधूनच प्रवास करायचे.

 

Manohar Parrikar, स्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी

पर्रिकर अत्यंत साधं जीवन जगायचे. त्यांना मोठ-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायचीही आवड नव्हती. त्यांना जिथे कुठे चांगली जागा दिसली, मग तो कुठला ठेलाच असो, ते तिथेच त्यांची स्कूटर थांबवायचे आणि त्यांना आवडेल ते खायचे. अनेकदा त्यांना रस्त्याशेजारी टपरीवर चहा पितानाही बघितलं गेलं आहे. तसेच ते कुठल्या कार्यक्रमातही अगदी सामान्य लोकांप्रमाणे सहभागी व्हायचे. एकदा तर एका लग्नात त्यांना चक्क रांगेत उभं असलेलं बघितलं गेलं. त्यांचा हा फोटो बराच व्हायरल झाला होता.

 

Manohar Parrikar, स्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी

मनोहर पर्रिकर यांची कपडे घालण्याची पद्धतही अगदी साधी होती. त्यांना बघून कुणालाही असं वाटणार नाही की, ते देशाचं संरक्षण मंत्री होते किंवा ते गोव्याचे मुख्यमंत्री होते, इतकं साधं त्यांचं राहाणीमान होतं. ते साधा शर्ट आणि पँट घालायचे. त्यांची जीवनशैली आणि साधेपणा लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करायचा. ते सामान्य जनतेचे नेते होते. ते एक असे नेते होते ज्यांच्यां प्रतिमेवर एकही डाग नव्हता, त्यांच्या संपूर्ण राजकीय करीअरमध्ये कुठल्याही घोटाळ्यात त्यांचं नाव आलं नाही. असा एक इमानदार नेता आज देशाने गमावला आहे. अशा या मनोहर पर्रिकरांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली…!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *