AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price Today | करामुळे ‘कार’वाले धास्तावले, पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स अव्वाच्या सव्वा

गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत होती. मात्र, आज भाव स्थिरावलेले आहेत.

Petrol-Diesel Price Today | करामुळे 'कार'वाले धास्तावले, पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स अव्वाच्या सव्वा
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 20, 2021 | 12:08 PM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे (Petrol-Diesel Price Today). तर डोमेस्टिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कुठलाही बदल झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत होती. मात्र, आज भाव स्थिरावलेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो . त्यामुळे तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर जारी करतात (Petrol-Diesel Price Today).

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, बुधवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 85.20 रुपये प्रति लीटर इतका असेल. तर मुंबईत 91.80 रुपये प्रति लीटर असेल. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 86.63 रुपये प्रति लीटर असेल. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर…

पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.

देशाच्या मुख्य शहरांमधील पेट्रोलचे दर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 85.20 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 91.80 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 86.63 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 87.85 रुपये प्रति लीटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 84.83 रुपये प्रति लीटर

मुख्य शहरांमधील डिझेलचे दर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 75.38 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 82.13 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 78.97 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 80.67 रुपये प्रति लीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 75.83 रुपये प्रति लीटर

Petrol And Diesel Price Today

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर

कोल्हापूर –

पेट्रोल : 91.52 रुपये प्रति लीटर

डिझेल : 80.60 रुपये प्रति लीटर

नागपूर –

पेट्रोल : 91.76 रुपये लीटर

डिझेल : 82.42 रु रुपये लीटर

पुणे –

पेट्रोल : 91.47 रुपये लीटर

डिझेल : 80.58 रुपये लीटर

औरंगाबाद –

पेट्रोल : 92.77 रुपये लीटर

डिझेल : 83.08 रुपये लीटर

नाशिक –

पेट्रोल : 92.24 रुपये लीटर

डिझेल : 81.24 रुपये लीटर

जळगाव –

पेट्रोल : 92.26 रुपये लीटर

डिझेल : 81.64 रुपये लीटर

रायगड – खोपोली –

पेट्रोल : 91.69 रुपये लीटर

डिझेल : 80.76 रुपये लीटर

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात (Petrol-Diesel Price Today).

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

Petrol-Diesel Price Today

संबंधित बातम्या :

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol And Diesel Price | पेट्रोलचे दर 91 रुपयांच्या पार, डिझेलही महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

कच्च्या तेलाच्या निर्मितीमध्ये सौदी अरेबियाकडून कपात; देशात पेट्रोल, डिझेलचे दर कडाडले

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी