AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वच बुद्धिमान माणसांमध्ये असते ही कॉमन सवय, जर तुम्हालाही असेल तर तुम्ही खरे हुशार, संशोधनातून धक्कादायक माहिती

लंडनच्या प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट डॉ. जोसेफ जेबेली यांनी या संदर्भात एक मोठं संशोधन केलं आहे, त्यांनी फक्त संशोधनच केलं नाही तर त्यांनी असा दावा देखील केला आहे, की बुद्धिमान लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन असते, या संशोधनाने जुन्या विचारांना चांगलाच हादरला दिला आहे.

सर्वच बुद्धिमान माणसांमध्ये असते ही कॉमन सवय, जर तुम्हालाही असेल तर तुम्ही खरे हुशार, संशोधनातून धक्कादायक माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2025 | 5:02 PM
Share

तुम्ही अनेकदा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला असा सल्ला देताना पाहिलं असेल की, काम कर रिकामा बसू नकोस, जर रिकामा बसला तर तुझं डोकं चालणार नाही, मेहनत करत राहा. जर तुला बुद्धिमान व्हायचं असेल तर काही नं काही तरी वाच, नव नव्या गोष्टी शिकत राहा. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की खरच असं होतं का? की तुम्ही काम केलं नाही तर तुमचा मेंदू काम करायचं बंद करतो का? या संदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे, या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

लंडनच्या प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट डॉ. जोसेफ जेबेली यांनी या संदर्भात एक मोठं संशोधन केलं आहे, त्यांनी फक्त संशोधनच केलं नाही तर त्यांनी असा दावा देखील केला आहे, की बुद्धिमान लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन असते, जोसेफ यांच्या या संशोधनाने बुद्धिमान होण्यासाठी जे लोक सतत मेहनत करत राहतात, वाचन करत राहतात, नवीन गोष्टी शिकत राहतात, त्यांच्या पारंपरिक विचारांना या संशोधनाने मोठा धक्का दिला आहे.

डॉ. जोसेफ जेबीली यांनी यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून न्यूरोसायंसमध्ये पीएचडी केली आहे, तसेच त्यांनी यूनिवर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधून देखील पीएचडीची डिग्री मिळवली आहे, त्यानंतर त्यांनी या संदर्भात संशोधन केलं आहे. त्यांनी आपल्या या संशोधनामध्ये बुद्धिमान लोकांमध्ये असलेली एक कॉमन सवय सांगितली आहे.

डॉ. जेबेली यांच्या संशोधनानुसार एकांतात वेळ घालवनं आणि मेंदूला आराम देणं या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. जेबेली यांच्या या दाव्यानुसार जे बुद्धिमान लोक असतात त्यांच्यामध्ये ही कॉमन सवय असते की त्यांना एकांतात वेळ घालायला आवडतो, तसेच ते वर्षातून ठराविक दिवस आपल्या मेंदूला आराम देतात, असा दावा जेबिली यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी बिल गेट्स यांचं उदाराहण देखील दिलं आहे, बिल गेट्स हे त्यांच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा काम करत होते, तेव्हा ते वर्षातून दोन वेळा एकतांत जात असत असं त्यांनी म्हटलं आहे.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.