पंतप्रधानांच्या घरासमोर संतापाला करुन देणार मोकळी वाट, AAP कार्यकर्ते होळी पण साजरी नाही करणार

Arvind Kejriwal AAP | भाजपला लोकसभा निवडणूक हायजॅक करायचा आरोप करत आप कार्यकर्त्यांनी दिल्लीत संतापाला वाट मोकळी करुन दिली. आप कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत.

पंतप्रधानांच्या घरासमोर संतापाला करुन देणार मोकळी वाट, AAP कार्यकर्ते होळी पण साजरी नाही करणार
आप कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घालणार घेरावImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 9:27 AM

दिल्लीत सध्या घमासान सुरु आहे. सक्तवसुली संचालनालयाने(ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याने आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी कालपासून विविध भागात प्रदर्शने केले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आता होळी ही साजरी न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणूकच हायजॅक करण्यासाठी भाजप विरोधी गोटातील नेत्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. आपचे कार्यकर्ते 26 मार्च रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत. आम आदमी पार्टीचे दिल्ली संयोजक गोपाल राय यांनी ही घोषणा केली. केजरीवाल यांना भेटू देण्यात येत नसल्याने आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी ईडीने केजरीवाल यांना अटक केली.

शहिदी पार्कमध्ये येणार एकत्र

कार्यकर्ते, नेत्यांना पोलिसांनी दिवसभर ताब्यात ठेवले. केजरीवाल यांच्या अटकेने संताप व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी सर्व आमदार, आपचे पदाधिकारी, नगरसेवक, इंडिया ब्लॉकचे प्रतिनिधी या अटकेविरोधात एकत्र येतील. 23 मार्च रोजी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा शहिद दिवस आहे. यादिवशी शहिदी पार्कमध्ये सर्व जण एकत्र येणार आहेत. त्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पण समावेश असल्याचे गोपाल राय यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधानांच्या घराला घेराव

पंतप्रधानांविरोधात आपच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्याधिक रोष असल्याचे दिसून आले. भाजप दमनशाही, दडपशाहीचा वापर करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. 24 मार्च मार्च रोजी आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार आहे.  25 मार्च रोजी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 26 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येणार असल्याचे गोपाल राय यांनी स्पष्ट केले.

लवकरच संयुक्त आंदोलन

  • आप पक्ष आणि त्यासंबधीत इतर घटक लवकरच एक संयुक्त आंदोलन करणार आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीसह विविध राज्यात प्रदर्शन केले. पश्चिम बंगालचे सदस्य आणि समर्थकांनी कोलकत्ता येथे भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ संताप व्यक्त केला.
  • “अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक ही लोकशाहीवरील हल्ला आहे. भाजप देशातील सर्वात लोकप्रिय विरोधी नेत्यांपैकी एक अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. लोकसभा निवडणूक हायजॅक करण्याचा हा भाजपचा डाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ईडी यापूर्वी अटक केलेल्या आपच्या नेत्यांविरोधात एकही पुरावा सादर करु शकली नाही.” असे पश्चिम बंगालचे प्रवक्ते अर्नब मैत्रा म्हणाले.
Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.