AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्ष 2025 मध्ये तुमच्या नात्याला ‘या’ पद्धतीने बनवा घट्ट

आजकाल बिझी लाइफस्टाइलमुळे अनेक जण आपल्या खास लोकांना वेळ देऊ शकत नाहीत, ज्यामुळे नातं कमकुवत होऊ लागतं. जर तुम्हाला तुमचं नातं मजबूत करायचं असेल तर आम्ही तुम्हाला त्यांचे पालन करण्यासाठी काही मार्ग सांगणार आहोत.

नववर्ष 2025 मध्ये तुमच्या नात्याला 'या' पद्धतीने बनवा घट्ट
lifestyleImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 31, 2024 | 6:06 PM
Share

प्रत्येकाला जीवन जगताना नातेसंबंध आयुष्यासाठी खूप महत्वाचे असतात. आपल्या माणसांची उपस्थिती आपल्याला आनंद, आधार आणि शक्ती देते. २०२५ मध्ये जसजसे जग वेगाने आणि डिजिटल होत चालले आहे, तसतसे नातेसंबंध टिकवण्याचे आव्हान वाढले आहे. सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल कनेक्शनने आपण प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट आहोत. तसेच लांब पल्ल्याच्या माणसाला सुद्धा आपल्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या सर्वांच्या मागे आपण आपल्या माणसांना प्रत्यक्षात भेटण्याचा वेळच देत नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी आपण आपल्या माणसांसोबत असलो तरी वास्तविक कनेक्शनऐवजी ते अंतराचे कारण असू शकते.

या बदलत्या काळात आपले नाते संबंध मजबूत आणि निरोगी राहावेत असे वाटत असेल तर त्यासाठी प्रयत्न करा. आज आम्ही तुमच्यासोबत काही खास मार्ग आणि उपाय शेअर करत आहोत, ज्याद्वारे तुम्ही 2025 मध्ये तुमचे नाते संबंध अधिक चांगले आणि मजबूत बनवू शकता. या टिप्स मुळे तुमच्या नात्यात नाविन्य तर येईलच.

2025 मध्ये संबंध घट्ट मजबूत करण्याचे 5 मार्ग

१. ऐकण्याची सवय लावा

नातं कायम टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचं ऐकणं खूप गरजेचं असतं. तसेच रोजच्या धावपळीत नेहमी समोरच्या व्यक्तीसाठी वेळ काढा आणि आपला जोडीदार, कुटुंब किंवा मित्र काय म्हणतात ते काळजीपूर्वक ऐका. नुसतं उत्तर देण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ नका तर समजून घेण्याचा ही प्रयत्न करा. त्यांच्या भावनांची काळजी घ्या आणि तुम्ही त्यांची काळजी घेत आहात असे त्यांना वाटू द्या.

२. आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढा

आजकाल बहुतेक लोकं आपल्या रोजच्या कामामुळे आणि लाइफस्टाइलमुळे खूप बिझी असतात. परंतु यासर्व गोष्टींमधून तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि प्रियजनांसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्य असल्यास दिवस, आठवडा किंवा महिन्यात तुमच्या खास लोकांसाठी वेळ काढा आणि कोणतेही गॅझेट किंवा डिव्हाइस न घेता त्यांच्यासोबत ‘क्वालिटी टाइम’ घालवा. एकत्र स्वयंपाक करा, चित्रपट पहा किंवा लांब फिरायला जा. हे सर्व केल्याने नाते घट्ट होते.

३. सरप्राईज दिल्यावर आपल्या व्यक्तीचे कौतुक करा

तुमच्या नात्यात प्रेम टिकवायचे असेल तर तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला त्यांच्या आवडीची वस्तू आणा किंवा कुठेतरी बाहेर घेऊन फिरून आणा यासारखे छोटे-छोटे सरप्राईज देऊन एखादा क्षण करा. त्याचबरोबर जी व्यक्ती नातं टिकवण्यासाठी मनापासून काहीतरी करत असेल तर त्यांचे वेळोवेळी कौतुक करा आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार माना.

४. प्रामाणिक रहा

तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी, मित्रांशी किंवा प्रियजनांशी कधीही खोटं बोलू नका. तुमचे विचार, भावना आणि शुभेच्छा नेहमी प्रामाणिकपणे शेअर करा. त्यांच्याशी कधीही खोटं बोलू नका किंवा बहाणा करू नका. कारण नात्यात असलेल्या पारदर्शकतेमुळे तुमच्या नात्यात विश्वास आणि स्थैर्य येते. त्यामुळे समस्या लपवण्यापेक्षा मोकळेपणाने बोला.

५. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा

आजकाल टेक्नॉलॉजीचे युग सुरु आहे. अशावेळी सोशल मीडिया द्वारे लोकं मेसेज करणं पसंत करतात. पण तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला तसेच आपल्या माणसांना तसे करू नका. टेक्स्ट मेसेज किंवा व्हिडिओ कॉल व्यतिरिक्त तुमच्या माणसांसोबत भेटण्याचा प्लॅन करा भेटून बोलण्याला प्राधान्य द्या. सोशल मीडियावर कमी आणि वैयक्तिक संभाषणांवर जास्त लक्ष केंद्रित करा. टेक्नॉलॉजीचा वापर फक्त नातं घट्ट करण्यासाठी करा, अंतर वाढवण्यासाठी नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.