AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

भाजपचे गढवाल येथील खासदार तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. (Tirath Singh Rawat To Be New Uttarakhand Chief Minister)

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Tirath Singh Rawat, Uttarakhand Chief Minister
| Updated on: Mar 10, 2021 | 11:59 AM
Share

डेहराडून: भाजपचे गढवाल येथील खासदार तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज दुपारी 4 वाजता तीरथ सिंह रावत मुख्ममंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. (Tirath Singh Rawat To Be New Uttarakhand Chief Minister)

भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात नवा मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. आज डेहराडून येथे भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक झाली. त्यात तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने उत्तराखंडमधील पेच सुटला आहे.

कोण आहेत तीरथ सिंह रावत

तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. ते उत्तराखंड भाजपचे अध्यक्षही राहिलेले आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिवही आहेत. त्याशिवाय भाजपच्या राज्यस्तरावरील अनेक पदांवर त्यांनी काम केलं आहे.

निवडीनंतर रावत काय म्हणाले?

मुख्यमंत्रीपदी नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रावत यांनी मीडियाशी संवाद साधला. मी संघासाठी काम करत होतो. भाजपमध्ये येण्याचा कधीच विचार केला नव्हता. परंतु अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी सक्रिय राजकारणात आलो, असं रावत म्हणाले. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यासोबत मी दीर्घकाळ काम केलं होतं. आधी संघप्रचारक म्हणून काम केलं. त्यानंतर पार्टी आणि सरकारच्या स्तरावर काम केलं. आजही त्रिवेंद्र सिंह रावत आपले मार्गदर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं. (Tirath Singh Rawat To Be New Uttarakhand Chief Minister)

संबंधित बातम्या:

भगतसिंह कोश्यारी बॅक टू उत्तराखंड? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाव आघाडीवर

Haryana Trust Vote: हरियाणात भाजप सरकारवर गंडांतर; काँग्रेस अविश्वास प्रस्ताव मांडणार

केरळमध्ये CPIM चा मोठा निर्णय, तरुणांना संधी देण्यासाठी 5 मंत्र्यांसह 25 आमदारांचं तिकिट कापलं

(Tirath Singh Rawat To Be New Uttarakhand Chief Minister)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.