TRAI : तुमचा मोबाईल नंबर आता 11 अंकी होणार

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईल नंबर 10 आकड्यांवरुन आता 11 आकडी (Trai increase mobile number digits) करण्याचा विचार करत आहे.

Trai increase mobile number digits, TRAI : तुमचा मोबाईल नंबर आता 11 अंकी होणार

नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईल नंबर 10 आकड्यांवरुन आता 11 आकडी (Trai increase mobile number digits) करण्याचा विचार करत आहे. लवकरच TRAI कडून तुमचा मोबाईल नंबर 11 आकडी (Trai increase mobile number digits) करण्यात येईल. रिपोर्टनुसार, सिम कार्डच्या संख्येतही वाढ करण्याचा विचार केला जात आहे.

हे जर शक्य झालं तर मोबाईल नंबरमध्ये 10 ऐवजी 11 आकड्यांचा वापर केला जाईल. देशात टेलिकॉम कनेक्शनच्या (Telecom Connections) मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे 11 अंकी मोबाईल नंबर केले जाणार आहेत.

TRAI नुसार 2050 पर्यंत टेलिकॉम कनेक्शनच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. याशिवाय 260 कोटी आकड्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे ट्रायने मोबाईल नंबरच्या आकडे वाढवण्याचा निर्णय घेतला.

देशात सध्या 10 आकड्यांचे 210 कोटी कनेक्शन आहेत. जे 7, 8 आणि 9 नंबरने सुरु होतात. ट्रायने या मुद्द्यावरुन लोकांकडून त्यांची मतंही मागितली.

दरम्यान, 1993 आणि 2003 मध्ये TRAI ने मोबाईल नंबरचे विश्लेषण केले होते. TRAI नुसार कनेक्शनच्या मागणीत होत असलेल्या वाढीमुळे नंबर रिसोर्सेजला धोका होऊ शकतो. यासाठी TRAI ने मोबाईल नंबरचे आकडे वाढवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय TRAI लँडलाईन आकड्यांचे अंकही 10 आकडी होऊ शकतात. तसेच डोंगलच्या कनेक्शनचे आकडे 13 आकडी होऊ शकतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *