AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमध्ये अपंग, वरिष्ठ नागरिक यांच्याशिवाय या अन्य प्रवाशांना सुद्धा मिळते प्रवास भाड्यात सूट, चला तर मग जाणून घेऊया

मुंबईः भारतीय रेल्वे(Indian railways) प्रत्येक वर्गातील लोकांना चांगली सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असते. ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे त्यांना योग्य ती सेवा देण्यात भारतीय रेल्वे प्राधान्य देताना दिसते. याशिवाय विविध प्रवाशांसाठी प्रवासी भाड्यात सूट( concession) दिली जाते. अनेकदा लोकांचे असे म्हणणे असते की, प्रवास भाड्यात फक्त सीनियर सिटीजन आणि अपंग प्रवाशांना सूट दिली […]

ट्रेनमध्ये अपंग, वरिष्ठ नागरिक यांच्याशिवाय या अन्य प्रवाशांना सुद्धा मिळते प्रवास भाड्यात सूट, चला तर मग जाणून घेऊया
भारतीय रेल्वे
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 5:43 PM
Share

मुंबईः भारतीय रेल्वे(Indian railways) प्रत्येक वर्गातील लोकांना चांगली सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असते. ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे त्यांना योग्य ती सेवा देण्यात भारतीय रेल्वे प्राधान्य देताना दिसते. याशिवाय विविध प्रवाशांसाठी प्रवासी भाड्यात सूट( concession) दिली जाते. अनेकदा लोकांचे असे म्हणणे असते की, प्रवास भाड्यात फक्त सीनियर सिटीजन आणि अपंग प्रवाशांना सूट दिली जाते. मात्र असे नसून अनेक असे वर्ग आहेत ज्यामध्ये प्रवाशांना (passenger) सूट दिली जाते चला तर मग जाणून घेऊया या यादीत कोणा कोणाचा समावेश आहे.

शारीरिक रूपाने अपंग व्यक्तींना आपल्या सोबत एका प्रवाशाला घेऊन जाण्याची परवानगी असते. त्यांना 3 एसी, चेअरकार, शयनयान आणि सेकंड क्लासमध्ये 75 टक्के, फर्स्ट एसी आणि सेकंड एसीमध्ये 50%, राजधानी किंवा शताब्दी सारख्या एक्सप्रेसमध्ये 3 एसी आणि चेअर कार मध्ये 25 टक्के सूट दिली जाते.

रुग्णांसाठी भारतीय रेल्वे देते सेवा

उपचारासाठी जाणार्‍या कॅन्सर रुग्णाला आणि एका सहकाऱ्याला सेकंड क्लास, प्रथम श्रेणी, चेअर कारमध्ये 75 टक्के, शयनयान आणि थ्री एसी मध्ये 100 टक्के, फर्स्ट एसी आणि सेकण्ड एसीमध्ये 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळते. तर थॅलेसिमिया रुग्णांना सेकंड क्लास, शयन यान, प्रथम श्रेणी, 3एसी चेअर कार मध्ये 75 टक्के, फर्स्ट आणि सेकंड एसी मध्ये पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळत असते. याशिवाय हार्ट सर्जरी, डायलिसिस, हेमोफिलिया यांसारख्या रुग्णांसाठी सुद्धा सूट मिळत असते.

शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीसाठी सोय

युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नी, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईत शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नी यांना 75 टक्क्यांपर्यंत प्रवासभाड्यात सूट मिळते.

विद्यार्थ्यांसाठीही योजना

होमटाऊन किंवा एज्युकेशन टूरवर जाणाऱ्या जनरल कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना सेकंड क्लास आणि शयन श्रेणी मध्ये 50 टक्के, एससी- एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सेकंड क्लास मिशन या श्रेणीमध्ये 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळत असते. तसेच ग्रॅज्युएट होईपर्यंत मुलींना आणि बारावी इयत्तेपर्यंत मुलांना (मदरशांतील विद्यार्थ्यासहित) घर ते शाळेपर्यंत सेकंड क्लास एमएसटी. याशिवाय ग्रामीण क्षेत्रांतील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा एज्युकेशन टूरसाठी सेकंड क्लास मध्ये 75 टक्के, मेडिकल, इंजिनिअरिंग इत्यादी प्रवेश परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील सरकारी शाळेतील मुलींना सेकंड क्लास मध्ये75 टक्के, युपीएससी (upsc), एसएससी (ssc) यांच्या मुख्य परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सेकंड क्लास मध्ये 50 टक्के, रीसर्च वर्कसाठी जाणाऱ्या 35 वर्षांपर्यंतच्या रिसर्चसर्सना सेकंड क्लास आणि शयनयान मध्ये 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळते.

विद्यार्थ्यांच्या शिबिरासाठीही सूट

राष्ट्रीय युवा परियोजना, मानव उत्थान सेवा समिती यांच्या शिबिरांमध्ये सहभाग घेण्यासाठी जाणाऱ्या युवकांना सेकंड क्लास आणि शयन श्रेणी मध्ये 50 टक्के, सार्वजनिक क्षेत्रातील नोकरी संदर्भातील इंटरव्यूसाठी जाणाऱ्या बेरोजगार युवकांना सेकंड क्लास आणि शयनश्रेणीमध्ये 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळत असते.

शेतकरी आणि औद्योगिक श्रमिक वर्गलाही लाभ

कृषी-औद्योगिक प्रदर्शनांमध्ये जाण्यासाठी शेतकरी आणि औद्योगिक श्रमिक वर्ग यांना सेकंड क्लास आणि शयन श्रेणी मध्ये 25%, शासनाद्वारा आयोजित विशेष गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांना सेकंड क्लास आणि शयन श्रेणीमध्ये 33 टक्के, उत्तम फार्मिंग अध्ययन प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा दौरा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि दुग्ध उत्पादकांना सेकंड क्लास आणि शयनयान श्रेणीमध्ये 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली जाते. संबंधित बातम्या

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.